भुसावळ सुरत गाडीलाही जनरल तिकीटही मिळणार
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ ते सुरत व भुसावळ ते नंदुरबार या गाड्यानांही आता जनरल तिकीट देण्यात येणार आहे. या गाड्यांना आरक्षित तिकीटांसह अनारक्षित तिकीटेही मिळणार असल्यामुळे प्रवाशी व चाकर मान्यांचे सोयीचे होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांमधुन स्वागत होत आहे.
पथदिवे लावण्याची मागणी
जळगाव : जिल्हा परिषद जवळील केळकर मार्केट परिसरातील अनेक ठिकाणी रात्रीचे पथदिवे बंद असल्यामुळे, चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पथदिवे नसल्यामुळे रात्री दहानंतर या परिसरात अंधार पसरलेला असतो. त्यामुळे मनपाने या भागात पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे.
उद्यानात स्वच्छता करण्याची मागणी
जळगाव : शहरात श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात अनियमित साफसफाई अभावी अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांमधुन करण्यात येत आहे.
कुशीनगर एक्सप्रेसची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसची वेळ सायंकाळी साडेपाच केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत : यामुळे सर्वाधिक चाकरमानी प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे सायंकाळी सव्वा सातची करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.