शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अवैध वाहतुकीने एसटीचे चाक तोटय़ात

By admin | Published: February 13, 2017 12:56 AM

लाखाचा तोटा तरीही सेवा हेच ब्रीद : पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाईची अपेक्षा

भुसावळ : प्रवासी हिताय, प्रवासी सुखाय हे ब्रीद घेऊन धावणा:या एसटीचे चाक तोटय़ात रुतले आह़े बदलत्या युगात खाजगी वाहतुकीला तोड देत आमूलाग्र बदल केल्यानंतर एसटी चाक तोटय़ातून बाहेर यायला तयार नाही़ त्यामागे दिवसागणिक वाढत असलेले डिङोलचे भाव व अवैध वाहतूकदारांचा बसस्थानकाला असलेला विळखा हे प्रमुख कारण आह़े सरासरी महिन्याला 40 लाखांचा तोटा स्थानिक एसटी आगाराला सोसावा लागत आह़े अशा कठीण परिस्थितीतही एसटीचे मार्गक्रमण सुरू आह़े अवैध वाहतूकदार बसस्थानकाबाहेरच वाहने लावून प्रवाशांची पळवापळवी करीत असताना पोलीस यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून असल्याचे शहरात चित्र आह़े बसस्थानकापासून किमान 200 मीटर अंतरार्पयत खाजगी वाहने लावण्यास कायद्याने बंदी असलीतरी येथल्या वाहनधारकांसाठी तो नियम लागू नाही अर्थात यामागे पोलीस प्रशासनाची मानसिकताही तितकीच कारणीभूत आह़े कारवाई झालीच तरी थातूर-मातूर होते मात्र दोन दिवसांनी पुढचे पाढे पंचावन्न असा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आह़ेबसस्थानकातून प्रवाशांची वाहतूक करणारी अनेक वाहने परमीटविनाच धावत आहेत शिवाय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून अवैध वाहतूक पोलिसांदेखत सुरू आह़े अवैध वाहतूकदारांना कायद्याचा धाक वाटेल अशी कुठलीही कारवाई होत नसल्याचे चित्र आह़े सहायक पोलीस उपअधीक्षक नीलोत्पल यांच्याकडून शहरवासीयांना मोठय़ा अपेक्षा आहेत़परिवहन विभागाचे दुर्लक्षउपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर आठवडय़ातून एकदा शहरात कॅम्पसाठी येतात मात्र त्यांनीही डोळ्यावर पट्टी लावल्याने अवैध वाहतूकदारांचे फावले आह़े अनेक वाहनधारकांकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची बोंब आहे तर कागदपत्रांचाही अभाव असताना वाहतूक मात्र राजरोस सुरू आह़ेबसस्थानकातून अॅपे, टाटा मॅजिक, महेंद्रा मॅक्स, ओमनी आदी वाहनांद्वारे जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, फैजपूर, सावदा, वरणगाव आदी परिसरात मोठय़ा प्रमाणावर अवैध वाहतूक चालत़े वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी बसस्थानकाबाहेर वाहतूक नियंत्रीत करण्यासह बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करतात मात्र हे कर्मचारी हटताच अवैध वाहतूकदार आपलेच राज्य समजून थेट बसस्थानकात शिरून प्रवाशांची पळवापळवी करतात़ भल्या पहाटे व दुपारच्या वेळी पोलीस नसल्याने चित्र तर अधिक बिकट होत़े  बसस्थानकाच्या बाहेरच मनमानी पद्धत्तीने वाहने उभी केली जातात़वर्षभरात बदलले अनेक आगारप्रमुख4भुसावळ आगारात गत वर्षभरात अनेक आगारप्रमुख आले अन् गेल़े कायमस्वरुपी आगारप्रमुख नसल्यानेही एसटीचे चाक तोटय़ातून बाहेर येण्यास अडचणी निर्माण होत आह़े नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांना कर्मचारी ओळख होण्यासाठी व मार्ग समजून घेण्यासाठी किमान तीन महिने लागतात; मात्र त्यापूर्वीच एसटी प्रशासन दुस:या प्रशिक्षणार्थी अधिका:याची नेमणूक करीत असल्याचा प्रकार या आगारात सातत्याने घडत आह़े कायमस्वरूपी अधिकारी दिल्यास किमान तीन वर्षात तरी काही उपाययोजना होऊ शकतील, असाही मतप्रवाह आह़े 4भुसावळ आगाराकडे आजमितीस 65 बसेस आहेत़ शहरी व ग्रामीण भागात त्या प्रवाशांची वाहतूक करतात़ जंक्शन शहर व वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या बसेस अपूर्ण आहेत़ एसटी प्रशासनाने दखल घेऊन बसेसची संख्या वाढवल्यास प्रवाशांना अधिक सेवा देता येणे सोपे होणार आह़े उत्पन्न दाराशी मात्र नियोजनाचा अभाव4नंदुरबार-अमळनेर दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरी करणाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील रेल्वे गाडय़ा रद्द झाल्याने सुरत जाणा:या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ते खाजगी वाहतूक तसेच परराज्यातील बसेसद्वारा सुरत गाठत आहे मात्र केवळ परमीट नसल्याने उत्पन्न एसटीच्या दाराशी आले असतानाही त्यांना संधी कॅश करता आली नसल्याचे दुर्दैव आह़े नवापूर वा साक्रीर्पयत आम्ही बस सोडू त्याचे नियोजन सुरू असल्याचे आगारप्रमुख म्हणाल़े संधी असतानाही प्रशासन नियोजनात अडकले आह़े19 हजार कि़मी़चा प्रवास4भुसावळ आगारातील बसेस दरररोज 19 हजार किलोमीटरचा प्रवास करून लांब व मध्यम तसेच ग्रामीण भागासह 365 फे:या करतात या माध्यमातून दररोज आगाराला लाखोंचे उत्पन्न मिळते. शिवाय एकटय़ा ग्रामीण भागात 10 हजार किलोमीटर अंतराच्या फे:या होतात़ मात्र विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक सवलतीमुळे सर्वाधिक तोटा एसटीला ग्रामीण भागातील वाहतुकीमुळेच होत असल्याचे सूत्रांनी सांगितल़ेअवैध वाहतूक त्यासोबत वाढत्या डिङोलच्या तोटय़ामुळे सातत्याने एसटी तोटय़ात जात आह़े अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात येईल तसेच ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा मानस आह़े- संदीप पाटील, आगार व्यवस्थापक