चोपडा, जि.जळगाव : जैव विविधता नोंद वही करण्याबाबत लोकसमन्वय प्रतिष्ठान संस्थेमार्फत येथील म.गांधी महाविद्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण १६ रोजी घेण्यात आले.जैवविविधता कायदा केंद्र सरकारने २००२ साली पारीत केला व राज्य सरकारने हा कायदा २००८ साली पारीत केला. मात्र ह्या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत संथगतीने सुरू असल्याने काही व्यक्ती सुप्रीम कोर्टात गेल्याने व सुप्रीम कोर्टाने या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत ३१ जानेवारीपर्यत जैवविविधता नोंद वही तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेने गणपूर, सत्रासेन, मोरचिडा, उमर्टी, वैजापूर, कर्जाने, मेलाने, देवझिरी, बिडगाव, बोराजटी, कृष्णापूर, मोहरद, वराड, विषणापूर व विरवाडे अशा १५ ग्रामपंचायतीत ७ ते २३ डिसेंबर दरम्यान लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेचे प्रशिक्षक व तज्ज्ञ व्यक्ती गावात जाऊन नोंद वही तयार करण्यासाठी संबंधित समितीला साह्य करेल व नोंदवही तयार करून घेईल यासाठी संस्थेच्या तज्ज्ञ व प्रशिक्षित लोकांचे एक दिवसीय प्रशिक्षण महात्मा गांधी महाविद्यालयात घेण्यात आले आहे.मार्गदर्शन करण्यासाठी लोक समन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शेती तज्ज्ञ निशांत मगरे, जैव विविधता व गौण उपजाबाबत तज्ज्ञ व्यक्ती कल्पवृक्ष संस्थेचे अतुल जोशी व डॉ.चंद्रकांत बारेला यांनी मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणात प्रत्येक ग्रामपंचायतीतील दोन युवा व समिती सदस्य व ४० समाजकार्य पदवी घेतलेले प्रशिक्षक सहभागी झाले होते.प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी वैजापूरचे सरपंच प्रकाश बारेला, गाजू बारेला, संजय शिरसाठ, कोमल पाटील परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्रा.डॉ.आर.आर.पाटील, प्रा.मुकेश पाटील, प्रा.अभिजित साळुंखे, प्रा.सुनीता पाटील यांनी सहकार्य केले.
चोपडा येथे जैवविविधता नोंद वही तयार करण्याबाबत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 4:36 PM
जैव विविधता नोंद वही करण्याबाबत लोकसमन्वय प्रतिष्ठान संस्थेमार्फत येथील म.गांधी महाविद्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण १६ रोजी घेण्यात आले.
ठळक मुद्देलोकसमन्वय प्रतिष्ठान संस्थेमार्फत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रममहात्मा गांधी महाविद्यालयात तज्ज्ञांनी दिले प्रशिक्षण७ ते २३ डिसेंबर दरम्यान प्रशिक्षक व तज्ज्ञ गावात देतील माहिती