जळगाव : ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला असला तरी रेड झोन (जळगाव मनपा) व जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवेसह इतरही दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टारंट, नाश्त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, मॉल, सलून बंद राहणार आहेत. नागरिकांनी बाजारात विनाकारण गर्दी करू नये तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासंदर्भात २१ मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आदेश निर्गमित केले. आता केवळ रेड व नॉन रेड झोन असे दोनच झोन असून जळगाव मनपा क्षेत्र हे पूर्णपणे रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रात सध्याचे बंधने कायम आहे.जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर ठिकाणी व्यवहार सुरूजळगाव शहर वगळता तसेच जिल्ह्यात जेथे प्रतिबंधीत क्षेत्र आहे ते क्षेत्र वगळून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मॉल, चित्रपटगृह बंद राहणारमात्र जिल्ह्यातीलदेखील हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टारंट, नाश्त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, मॉल, सलून, चित्रपटगृह बंद राहणार आहेत.कण्टेनमेण्ट झोन वगळता जिल्ह्यात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी काही नियमांचे पालन ग्राहक व दुकानदारांना करावे लागणार आहे.यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे, ग्राहक आणि दुकानदार यांनी मास्क वापरणे, दुकानाच्या बाहेर ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे, दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवणे अशाप्रकारे नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रेडझोन झोनमध्ये आॅनलाईन मद्यविक्री तर इतर ठिकाणी साठा संपविण्याची परवानगीरेडझोनमध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर ठिकाणी आॅनलाईन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातही प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर ठिकाणी मद्य विक्रीच्या दुकानांमधील साठा संपविण्यापर्यंत मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना नवीन साठा मागविता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.साफसफाईस परवागीचित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश असले तरी ३१ मेनंतर ते सुरू होऊ शकतात, त्यामुळे त्यांच्या साफसफाईसाठी चित्रपटगृह उघडून सफाई करता येईल, मात्र ते सुरू करता येणार नसल्याचेही आदेशात म्हटले आहे.रेड झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी हे राहणार सुरु-मॉल, हॉटेल, सलून वगळून इतर दुकाने-लिकर, वाइन शॉप-खासगी दवाखाने-जीवनावश्यक मालवाहतूक-उद्योग-बियाणे, खते विक्री-फळ, भाजीपाला दूध-किराणा, मेडिकल दुकाने-रुग्णवाहिका, शववाहिनी-पेट्रोल, डिझेल-धान्य दुकानातून वितरणहे बंद राहणार-शाळा, महाविद्यालये-रेल्वे, विमान-हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ-पाणीपुरी भेलपुरीची दुकाने-सलून, ब्युटी पार्लर, स्पा- जिल्ह्याच्या सीमा-मॉल्स, सिनेमा थिएटर-प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व व्यवहार बंद-रेड झोनमध्ये केवळ आॅनलाईन मद्यविक्रीस परवानगी वगळता इतर बंधने कायम
मनपा व प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी आजपासून व्यवहार सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 1:14 PM