जळगाव : जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे. बदली झालेल्यांमध्ये अविनाश जाधव (पुरवठा निरीक्षक) यांची चोपडा तहसील कार्यालयात मंडळाधिकारी रिक्तपदावर बदली करण्यात आली आहे. साळवा, ता. धरणगाव येथील मंडळाधिकारी गणेश बिºहाडे यांची सोनवद ता.धरणगाव येथे मंडळाधिकारी म्हणून, अव्वल कारकून उल्हास देशपांडे (चाळीसगाव) यांची शिरसगाव ता.चाळीसगाव येथे मंडळाधिकारी, बामणोद, ता यावलचे मंडळाधिकारी बाबु पवार यांची सावदा मंडळाधिकारीपदी, अव्वल कारकूर विनोद कुमावत (तहसील पाचोरा) यांची तळेगाव ता.चाळीसगाव मंडळाधिकारीपदी, मंडळाधिकारी प्रकाश बाविस्कर (सोनवद, ता.धरणगाव) यांची तहसील कार्यालय जामनेर येथे अव्वल कारकूनपदी, अव्वल कारकूर धनसिंग कोळी ( तहसील कार्यालय, जामनेर) यांची जामनेर तहसील कार्यालय येथे मंडळाधिकारीपदी, अव्वल कारकून महेंद्रकुमार दुसाने (भुसावळ) यांची तहसील कार्यालय, भुसावळ येथे मंडळाधिकारीपदी, पुरवठा हिशोब कारकून अजिंक्य आंधळे (पाचोरा) यांची म्हसावद ता. पाचोरा येथे मंडळाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मंडळाधिका-यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 12:39 PM