- कुंदन पाटील
जळगाव : राज्य शासनाच्या महसुल विभागाने बुधवारी रात्री नाशिक विभागातील २१ तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात शहादा, शिरपूर, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर येथील तहसीलदारांचा समावेश आहे.
दरम्यान, यापूर्वीच रावेरहून बदलून आलेल्या उषाराणी देवगुणे या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत तहसीलदार म्हणून नियुक्ती मिळाली आहे.मंगळवारी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात जळगावचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनाही अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश लवकरच निघणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
तहसीलदारांचे सध्याची व नवव्या नियुक्तीचे ठिकाण
तहसीलदार- सध्या- बदलीचे पदअमोल मोरे- चाळीसगाव- राहाता (नगर)मिलिंद वाघ- अमळनेर- निवडणूक शाखा नगरडॉ.उल्हास देवरे- महसुल, नंदुरबार- पारोळाअनील गवांदे- पारोळा- महसुल नंदुरबारउषाराणी देवगुणे- प्रतिक्षेत- कुळकायदा, जळगावमहेंद्र माळी- कुळकायदा, जळगाव- शिरपूरआबा महाजन- शिरपूर- येवला (नाशिक)हंसराज पाटील- निवडणूक शाखा, जळगाव - संजय गांधी, धुळे