महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले. त्यामुळे रहिवाशांनी तब्बल बारा तास वीजपुरवठा खंडित केला. जोपर्यंत ट्रान्सफार्मर स्थलांतरीत होत नाही तोपर्यंत आम्ही वीजपुरवठा सुरू करू देणार नाही, असा पावित्रा त्यांनी घेतला. संबंधित अभियंत्यास कळवूनही ते फिरकले नाही. शेवटी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून १२ तासात वीजपुरवठा सुरू झाला व पुन्हा रात्री स्थानिक रहिवाशांनी बंद केला.सूत्रांनुसार, येथील तीनही ट्रान्सफार्मर शेवटच्या घटीका मोजत आहेत. येथे एकाही ट्रान्सफार्मरला कटआउट नाही. केबल उघडी पडलेली आहे. यामुळे येथे मुके प्राणी अनावधानाने जातात व मृत्युमुखी पडतात. हे ट्रान्सफार्मर वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे येथे लहान मुलांना धोका होऊ शकतो. पाऊस पडल्यानंतर येथे जमिनीत वीजप्रवाह उतरतो. यामुळे मोठा धोका होऊ शकतो. गोरख गंभीर पाटील यांच्या घरासमोरच ट्रान्सफार्मर आहे. त्या ट्रान्सफार्मरमधून जमिनीत वीजप्रवाह उरला. जवळच त्यांची गाय व वासरू यांना विजेचा शॉक लागला. परंतु नागरिकांनी प्रसंगावधान राखत वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला.वेळोवेळी कळवूनही घेतली जात नाही दखलसंबंधित रहिवाशांनी वेळोवेळी वीज कंपनीच्या अभियंत्यास लेखी व तोंडी कळवूनही दखल घेत नाहीत व या तीनही ट्रान्सफार्मरची झालेली दैनावस्था पहाण्याची तसदी घेत नाहीत. ते जीवित हानी होण्याची वाट पहात आहेत की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.पाऊस येतो मिनिटभर वीज जाते घंटाभरपरिसरात वाºयाची झुळूक किंवा पावसाचे दोन थेंब आले तरी वीजपुरवठा कधी तासभर तर कधी तासन्तास खंडित होते. याचे मुख्य कारण म्हणजे जीर्ण वीज वाहिन्या व पावसाळ्यापूर्वी झाडांची कटिंग न होणे यामुळे थोडी वाºयाची झुळूक व पावसाचे दोन थेंबही वीज वाहिन्या सहन करत नाहीत. तरीही संबंधित अधिकारी मात्र दुुर्लक्ष करतात.हे ट्रान्सफार्मर खरोखर धोकादायक आहेत. अगोदर ते मोकळ्या जागेत होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ते लोकवस्तीत आल्याने ते धोकादायक ठरत आहेत. ते तीनही ट्रान्सफार्मर लवकरच इतरत्र हलवण्यात येतील.- जी. एस.मोरे, कनिष्ठ अभियंता, वीज कंपनी कार्यालय, भडगाव
महिंदळे येथील ट्रान्सफार्मर झाले जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 5:51 PM
महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले.
ठळक मुद्देस्थानिक रहिवाशांनी केला वीजपुरवठा खंडितट्रान्सफार्मरजवळ वीजप्रवाह उतरल्यावर गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावलेगावातील तीनही ट्रान्सफार्मर देत आहेत धोक्याची घंटालोकवस्तीला लागून आहेत ट्रान्सफार्मरट्रान्सफार्मर येथून दुसऱ्या जागेवर जात नाही तोपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ देणार नाहीदोनशे ग्राहकांना धरले धारेवर१२ तास वीजपुरवठा बंद तरीही अधिकारी व कर्मचारी सुस्त