सुनील पाटीलजळगाव : जिल्हा पोलीस दलात कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली आहे. बदलीपात्र कर्मचाºयांकडून विकल्प भरुन घेतले जात आहेत. प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही प्रकारच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात केल्या जातात. काही बदल्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष अधिकारात होतात. दरवर्षी बदल्यांमध्ये प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचा-यांवर अन्याय होतो तर काही विशिष्ट कर्मचाºयांनाच पाहिजे त्या ठिकाणी बदली मिळते. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या काळात अन्यायग्रस्त कर्मचाºयांना न्याय मिळाला होता. गॉडफादर असलेल्याचे जोरात चालते, मात्र ज्याला गॉडफादरच नाही, अशा कर्मचा-यांचे कमालीचे हाल होतात. प्रत्येक कर्मचा-याला संसार आहे. मुलांचे शिक्षण, काही मुले लग्नासारखी आहेत. ही परिस्थिती सर्वांची सारखीच असताना मोजक्याच लोकांना सोयीची बदली मिळते. नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांकडून आता यंदा प्रामाणिकपणे बदल्यांची अपेक्षा आहे. प्रत्येक कर्मचा-याचे रेकॉर्ड बोलते. कागदावरच कळते, की कोणत्या कर्मचा-याची सेवा कुठे व किती झालेली आहे. त्यामुळे डॉ.पंजाबराव उगले यांनी रेकॉर्ड तपासूनच बदल्या कराव्यात अशी अपेक्षा कर्मचा-यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीणमध्ये देखील अनेक कर्मचारी एकेका पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. जो कर्मचारी काम करतो, तो कामच करीत राहतो, जो प्रभारी अधिका-याच्या मागेपुढे फिरतो तो ड्युटीचे काम कधीच करीत नाही. त्याशिवाय ‘घरगडी’ आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात सात ते आठ कर्मचारी आहेतच. कागदावर पुरेसे मनुष्यबळ दिसत असले तरी हे कर्मचारी कोणत्याही कामात येत नाहीत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार दुसºयाच कर्मचाºयावर येतो. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ही तफावत व दरी दूर करावी अशी अपेक्षा आहे.
पोलीस बदल्यांमध्ये पारदर्शकता हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:21 PM
जिल्हा पोलीस दलात कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली आहे. बदलीपात्र कर्मचाºयांकडून विकल्प भरुन घेतले जात आहेत. प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही प्रकारच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात केल्या जातात. काही बदल्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष अधिकारात होतात.
ठळक मुद्देविश्लेषणवर्षानुवर्ष अनेक कर्मचा-यांवर अन्यायपोलीस अधीक्षकांकडून न्यायाची अपेक्षा