रावेर, जि. जळगाव : आजूबाजूला पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने रावेर तालुक्यातील ऐनपूरजवळ सुलवाडी-कोलदा हा अर्धा कि.मी.चा रस्ता पाण्यामुळे बंद झाला आहे. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, या बाबत माहिती दिली असता अधिकारी उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याचा आरोप सुलवाडे येथील सरपंच शीतल जोगी यांनी केला आहे. सकाळी ९ वाजेची बस येथून गेली. मात्र चालकाने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
ऐनपूरजवळ सुलवाडी-कोलदा रस्त्यावर अर्धा कि.मी.पर्यंत पावसाचे पाणी, वाहतुकीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:26 PM