भुसावळ, जि.जळगाव: येथील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गॅस किट व्हॅनमध्ये कोंबून नेण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक आजार जडण्याची शक्यता असून, गॅस किट वाहनामुळे स्फोटही होण्याची शक्यता आहे.रिक्षाचालकांना शिस्त लावावी म्हणून पोलीस प्रशासनातर्फे रिक्षाचालकांना गणवेशात राहणे अनिवार्य केले आहे. यामुळे रिक्षाचालकांना शिस्त लागत आहे. तसेच वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी येथील नेहमीच वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरणार हंबर्डीकर चौकात बॅरिकेट्स लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच रस्त्यांवर वाहतुकीला अडचण निर्माण करणाऱ्या हॉकर्सना नोटिसा देण्यात आल्या.एकंदरीत, वाहतुकीच्या दृष्टीने नियोजनपूर्व कार्य सुरू असताना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये गॅस किट व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोंबून येणाºया वाहनांवरही कारवाईची अपेक्षा होत आहे.अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण बंदिस्त असलेल्या गॅस किटमध्ये कोंबून गुरांंसारखे भरले जाते. गॅस किटमुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांमध्ये जळजळ, त्वचेचे विकार, मळमळ होणे, व्हॅनमधून उतरल्यानंतर उलटी असे प्रकार होताना दिसत आहे. तसेच दम्यासारखा रोगही होण्याची शक्यता असते.पोलीस प्रशासनाने गॅस किट व्हॅनमध्ये कोंबल्या जाणाºया विद्यार्थ्यांची नियमानुसार सुटका करावी. तसेच पालक वर्गानेही आपल्या मुलांना अशा वाहनांमध्ये बसवू नये याची काळजी घ्यावी. जेणेकरून आरोग्याला दुष्परिणाम होणार नाही.गॅस किट वाहनांमुळे डोळ्यांचे आजार, त्वचेचे विकार तसेच दमा यासारखे विकार जडण्याची शक्यता असते. वाहन हवेशीर व विद्याथी संख्या वाहनात कमी असावी.-डॉ.कीर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी, न.पा., भुसावळगॅस कीट व्हॅनचालकांनी नियमानुसारच गाडीमध्ये विद्यार्थ्यांना बसवावे. मुलांना कोणताही त्रास झाल्यास व क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवल्यास व गणवेशामध्ये नसल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.-गजानन राठोड, डीवायएसपी, भुसावळ विभाग
भुसावळ येथे शाळकरी विद्यार्थ्यांची गॅस किट व्हॅनमध्ये वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 6:42 PM
मुलांना आजार जडण्याची शक्यता : विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक
ठळक मुद्देजास्तीच्या तापमानामध्ये वाढ झाल्यास एखादे वेळेस गॅसचा स्फोटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची आवश्यकता