आॅनलाईन लोकमतजळगाव दि,८ : कौटुंबिक कामासाठी वराड येथे जात असलेल्या कमलाकर धनसिंग पाटील (वय ३७, रा.हनुमंतखेडा, ता.धरणगाव) या दुचाकीस्वार तरुणाला मागून लग्नाचे व-हाड घेऊन येणा-या खासगी ट्रॅव्हल्स बसने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता महामार्गावर वराड गावाजवळ घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कमलाकर पाटील हे कौटुंबिक कामासाठी वराड येथे जात होते. उषाबाई व अलकाबाई या दोन बहिणी व त्यांचे पती दुचाकीने पुढे गेले तर त्यांच्या मागे कमलाकर पाटील हे एकटेच दुचाकीवर होते. वराड गावात प्रवेश करीत असताना मागून लग्नाचे वºहाड घेऊन येणाºया कमळ एक्सप्रेस असे नाव असलेल्या श्री बालाजी ट्रॅव्हल्सने (क्र.एम.एच.१८ एम.११११) ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मागील टायरखाली आल्याने कमलाकर हे चिरडले गेले.
उपसरपंच धावले मदतीलाया घटनेची माहिती मिळताच वराड येथील उपसरपंच टिकाराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जि.प.सदस्य प्रताप पाटील यांना तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळावर बोलावले. प्रताप पाटील व टिकाराम पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून कमलाकर पाटील यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉ.सचिन अहिरे यांनी मृत घोषीत केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.जिल्हा रुग्णालयात आक्रोशकमलाकर यांचा मृतदेह पाहिल्यानंतर बहिणी, मेहुणे व अन्य नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. प्रताप पाटील यांनी या कुटुंबाला धीर दिला. त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा रेवन, दोन मुली, आई ठगूबाई व वडील असा परिवार आहे.