कुंदन पाटील
जळगाव : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे साचलेल्या फाईलींचा निपटारा करण्यात ‘कोषागार’ला यश मिळाले आहे. फाईलींच्या निपटारा करण्यात येथील कार्यालय राज्यात पाचव्यास्थानी आहे. रविवारीही या कार्यालयाने कामकाज सुरुच ठेवल्याने २९८ फाईलींचा निपटा करण्यात यश मिळविले आहे.
पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आठवडाभर संपावर होते. त्यामुळे ऐन मार्च महिन्यात ‘कोषागार’ कार्यालयातील देयकेंसह विविध वेतन, निवृत्तीवेतन व विविध योजनांचे अनुदान रखडण्याची भिती निर्माण झाली होती. जिल्हा कोषागार अधिकारी सुभाष गुंजाळ यांनी संपकाळातही उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने कामकाज सुरु ठेवले. तसेच संपानंतर रुजू झालेल्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरवी दररोज प्रलंबित फाईलींसह प्रस्तावांचा निपटारा करायला सुरुवात केली.
२२१ फाईल प्रलंबित
रविवारच्या आकडेवारीनुसार शनिवारी ५३५ फाईली प्रलंबित होत्या. त्यातीत २९८ फाईलींचा निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयात २२१ फाईली प्रलंबित आहेत. दि.२७ ते ३१ मार्चदरम्यान सुमारे २ हजार प्रस्तावांसह फाईली सादर होतील, यादृष्टीने या कार्यालयाने कामकाजाचे नियोजन केले आहे. तसेच मदतीसाठी नाशिक कार्यालयातील पाच सहकारी सोमवारी दाखल होणार आहेत.
विभागातील प्रलंबित प्रकरणे
शनिवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार विभागातील प्रलंबित प्रकरणे अशी : नाशिक-१६८६, जळगाव-४०९, अहमदनगर-५१९, नंदुरबार-३९२, धुळे-६८४
तालुकास्तरावर प्रलंबित प्रकरणेजळगाव-२२१भुसावळ-०६पारोळा-१०मुक्ताईनगर-४२अमळनेर-११भडगाव-१२चाळीसगाव-२०चोपडा-२७एरंडोल-३जामनेर-५पाचोरा-१८रावेर-२०यावल-१४बोदवड-०सर्वच सहकारी मेहनत घेत आहेत.आगामी तीन दिवस प्रचंड भार येणार आहे. पण मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात असल्याने मार्चअखेरीस १०० टक्के फाईलींचा निपटारा करु, असा विश्वास आहे.-सुभाष गुंजाळ, जिल्हा कोषागार अधिकारी.