जळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होऊन त्यातही रुग्णाला मृत घोषीत करण्याऐवजी उपचार सुरु केल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यास नातेवाईकास नकार दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जैनाबाद येथील रवींद्र भिका पाटील (वय ४६) यांना शनिवारी दुपारी १२.१५ वाजता प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर पाटील यांना वॉर्ड क्र.९ मध्ये हलविण्यात आले. तेथे दुपारी साडे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांचा श्वास थांबल्याचे नातेवाईकांनी तेथील कर्मचाºयांच्या लक्षात आणून दिले, मात्र या कर्मचारी रुग्णाकडे धाव घेण्याऐवजी मोबाईलवर बोलण्यात गुंग होत्या. खडसावून बोलल्यानंतर डॉक्टरांनी धाव घेतली असता पाटील यांचा मृत्यू झाला नाही असे सांगून त्यांना दोन इंजेक्शन देण्यात आले. मृत रुग्णावर तुम्ही उपचार करीत असल्याचे नातेवाईकांनी सांगूनही डॉक्टर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी इसीजी करुन खात्री करण्याचा आग्रह नातेवाईकांना धरला असता पाटील मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वैद्यकिय अधिकारी स्वप्नील कळकर यांनी ४.३० वाजता पाटील यांना मृत घोषीत केले. दरम्यान, पाटील हे दाणाबाजारात ट्रकवर चालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी रंजना, मुलगा स्वप्नील, सागर व अक्षय असा परिवार आहे. शवविच्छेदनास विरोधरवींद्र पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करता मृतदेह थेट घरी नेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली, मात्र डॉक्टरांनी असा मृतदेह घरी नेता येत नाही. शवविच्छेदनानंतरच मृतदेह ताब्यात मिळेल असे सांगितले. त्यावरुन पुन्हा नातेवाईक व डॉक्टरात वाद झाला. जिल्हा पेठचे सहायक निरीक्षक संदीप आराक, शनी पेठचे उपनिरीक्षक डी.बी.पाटील, दिनेशसिंग पाटील व सहकाºयांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितल्याने वाद मिटला व मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
मृत झालेल्या रुग्णावर डॉक्टरांकडून उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 9:24 PM
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होऊन त्यातही रुग्णाला मृत घोषीत करण्याऐवजी उपचार सुरु केल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यास नातेवाईकास नकार दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.
ठळक मुद्देशासकीय वैद्यकिय महाविद्यालयात डॉक्टर नातेवाईकात वाद शवविच्छेदनास विरोध