भुसावळ : वनसंर्वधन दिनानिमित्त येथील गोसेवा परिवार व सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.या मैदानावर याआधीसुद्धा या दोन्ही संस्थातर्फे वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे व या प्रांगणावर पालिकेतर्फे बाजार भरविण्यात येत होता. तसेच या भागात कंटेन्मेंट झोन असल्याने या भागात येता न आल्याने ही सर्व रोपे जळून गेली. म्हणून वनसंर्वधन दिनानिमित्त पुन्हा नवीन पाच झाडांचे रोपण (लागवड) करण्यात आले. मंदार बागुल यांनी वृक्षारोपणास लागणारे साहित्य देवून सहकार्य केले. यावेळी सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, तर गोसेवा परिवाराचे रोहित महाले, मयुर सावकारे, उमेश नेवे, रोहन पाटील, तुलसी माधवानी व पर्यावरणप्रेमी चंद्रशेखर जंगले आदी उपस्थित होते.वृक्षसंर्वधन करणे काळाची गरज -रोहित महाले .शहरासह ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होवून सिमेंटची जंगले तयार होत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणातील झाडे कमी होऊ लागली आहे. यामुळे वनात राहणारे जंगली प्राणीसुद्धा भरकटल्याने शहरातील लोकवस्तीकडे पाण्याच्या शोधात येऊ लागली आहे. यासाठी झाडे लावून व झाड़े जगवून वृक्षसंर्वधन करणे काळाची गरज आहे. याकरीता प्रत्येकाने आपल्या श्वासाप्रमाणे वनदेवतेची सेवा करुन वनसंर्वधन केले पाहिजे, असे मनोगत गोसेवक परिवाराचे रोहित महाले यांनी व्यक्त केले.प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एकतरी वृक्ष लावावा- राजश्री नेवेवनातील प्रत्येक गोष्ट मानवी जीवनास वरदान लाभले आहे झाडे. आपल्याला सावली फळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृदयात चालणारा श्वास देतात. वृक्ष कमी झाली यांची खंत सवार्ना जाणवू लागली आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एक तरी वृक्ष लावावा. जेणेकरून आपल्या लावलेल्या झाडामुळे सावली व फळे मिळेल उन्हाळ्यात स्वत:साठी गाडी लावण्यासाठी सावली हवी, असे राजश्री नेवे म्हणाल्या.
भुसावळात वनसंवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 3:59 PM