जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपूर्वी वादळाने वाहनतळात कोसळलेले झाड अखेर शनिवारी हटविण्यात आले. याच्या फांद्या तोडून कर्मचाऱ्यांनी हे झाड हटविले.
अर्धवट पीपीई किट
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी पीपीई किट बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक नातेवाईक अर्धवट पीपीई किट परिधान करून रुग्णालयात प्रवेश करीत आहेत. रोज प्रत्येक भेटीला स्वतंत्र पीपीई किट आणणार कुठून हा नातेवाईकांचा प्रश्न आहे.
ओपीडी सुरूच
जळगाव : जिल्हा परिषदेत बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे. या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी तसेच सदस्यांना औषधांचे वाटप करण्यात येत असते. मात्र, या ठिकाणी डॉक्टरांची उपस्थिती नसते, दोन महिन्यांपूर्वी हा विषय गाजला होता.
मृत्यू घटले
जळगाव : शहरातील कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी झाली असून गेल्या दोन दिवांपासून एकही मृत्यू नसल्याने दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील रुग्णसंख्याही कमी होत असल्याने संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे.