जळगाव : स्टेडिअमकडून रिंगरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दक्षता नगरच्या
प्रवेशद्वाराजवळच दोन मोठी सप्तपर्णीची झाडे होती. मात्र ही झाडे अचानक
तोडून टाकण्यात आली आहेत. दोन दिवसांपासून ही झाडे तोडण्याचे काम सुरू
होते. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.
सोमवारपासून सुरू होणारा सॉफ्टबॉलचा सराव
जळगाव : सोमवार, ११ जानेवारीपासून जिल्हा क्रीडा संकुलात सॉफ्टबॉलचा सराव
सुरू होणार आहे. गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध
खेळांचे सराव बंद होते. मात्र आता पुन्हा खेळांना सुरुवात होत आहे. त्या
अंतर्गत सॉफ्टबॉलचा सराव सुरू होणार आहे.
सॉफ्टबॉल खेळाडूंनी स्वच्छ केले मैदान
जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलात वाढलेल्या गवताकडे जिल्हा क्रीडा संकुल
समितीने नेहमीच दुर्लक्ष केले होते. मात्र पुन्हा एकदा खेळाला सुरुवात
होत असल्याने सॉफ्टबॉलच्या सरावासाठी मैदान स्वच्छ असावे, म्हणून
जळगावच्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडूंनी स्वत: मैदानातील गवत काढले.
१० रोजी क्रिकेट स्पर्धा
जळगाव : नेवे क्रिकेट क्लबने रविवारी सकाळी १० वाजेपासून क्रिकेट
स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा एम. के. स्पोर्ट्सच्या मैदानावर
होणार आहे. या स्पर्धेत सात संघ सहभागी झाले आहेत. त्या वेळी समाजबांधव
उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी बऱ्हाणपूर, जळगाव, पुणे, मुंबई येथून
संघ सहभागी झाले आहेत.