चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथे शुक्रवारी दुपारी वादळी वा:यासह पाऊस झाला. वा:यामुळे पिंपळाचे झाड एका झोपडीवर पडले. झाड पडले तेव्हा सहा महिन्यांच्या बालकासह सहा जण झोपडीतच होते. मात्र कुणालाही लागले नाही, सर्व जण बचावले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा अनुभव आंबेडकरनगरमध्ये राहणा:या साळुंखे कुटुंबाला आला. चहार्डी येथील घाडवेल रस्त्यावरील आंबेडकरनगरात पत्र्याच्या झोपडीत भैया साळुंखे (35) हे प}ी ज्योती साळुंखे (30), मुलगी कोमल (8), दीक्षा (6), नेहा (4), सहा महिन्यांचा मुलगा रुद्र याच्यासह राहतात. भैया साळुंखे हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या झोपडीशेजारी पिंपळाचे मोठे झाड आहे. शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह पावसाला सुरुवात झाली. वादळ सुरू झाल्याने बचाव म्हणून साळुंखे यांच्या घरातील सर्व लहान-मोठे सदस्य झोपडीत गेले. त्याचवेळी वादळामुळे पिंपळाचे झाड मुळासकट त्यांच्या झोपडीवर पडले. झोपडीतच सर्वजण अडकले होते. त्यांनी आरडाओरड केली. झोपडीवर झाड पडल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत झोपडीचे कुड तोडून सर्वाना बाहेर काढले. सर्व जण बालंबाल वाचले.या परिवाराला वाचविण्यासाठी प्रकाश वारडे, भागवत मोरे, भैया खैरनार, राकेश वारडे, देवीदास वारडे, भैया वारडे यांच्यासह आंबेडकरनगरातील रहिवाशांनी प्रय} केले.
वादळामुळे झोपडीवर झाड कोसळले
By admin | Published: June 03, 2017 1:21 AM