लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.१२ : कुंड्यापाणी ता. चोपडा येथील आदिवासी दाम्पत्याने घटस्फोट घेऊन नंतर पुन्हा एकत्र नांदण्यास सुरुवात केल्यावर जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार घालण्याची धमकी देत लाखाचा दंड केला, तो भरल्याशिवाय तुम्हाला एकत्र राहण्याचा अधिकार नाही असा निर्णयही कळविला. त्यामुळे या दाम्पत्याने अंनिस व पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी पंचांना कायद्याची जाणीव करून देत वेळीच समज दिली आणि पंचांचे डोळे उघडले. त्यांनी यापुढे जात पंचायतीकडून असे प्रकार घडणार नसल्याचे स्पष्ट कबूल करीत पावरा दाम्पत्याला पदरात घेतले. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.सातपुड्याच्या कुशीत वसलेले कुंड्यापाणी हे छोटेसे आदिवासी पाडा वजा खेडेगाव. तेथील बाळू नुरा पावरा याचा विवाह ६ वर्षापूर्र्वी जवळच असलेल्या वरगव्हाण ता. चोपडा येथील मुलीशी झाला. उभयतांचा संसार सुखरुप सुरु होता. त्यांना दोन अपत्ये झालीत . मध्यंतरी या दोघांमध्ये काही वाद निर्माण झाले. ते विकोपाला गेल्याने त्यांनी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे घटस्फोट घेऊन ते विभक्त राहू लागले. काही कालावधीनंतर दोघा नवरा बायकोमधील गैरसमज दूर होऊन वाद मिटला आणि ते पुन्हा संसार करण्यासाठी एकत्र आलेत.पंचांनी ठोठावला लाखाचा दंडदरम्यान, कुंड्यापाणी गावातील काही अशिक्षित पंचानी त्यांना एकत्र नांदण्यास मज्जाव केला. त्यांना पुन्हा एकत्र संसार करायचा असल्यास दोघा नवरा बायको यांना प्रत्येकी ५० हजार रुपये असा एक लाखांचा दंड ठोठावला. या गरीब आदिवासी दाम्पत्याला हा जाचक दंड भरणे शक्य नसल्याने त्यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस. कट्यारे यांच्या कडे आपली कैफियत मांडली. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी प्रा. कट्यारे, अंनिसचे चोपडा तालुकाध्यक्ष डॉ.अय्युब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रकुमार शिंपी यांनी अडावद पोलिस स्टेशन गाठून सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची भेट घेतली. या वेळी पिडीतांनी पंचानी लादलेल्या आर्थिक दंडात्मक शिक्षेबाबत आपबिती कथन केली. तेव्हा सपोनि हिरे यांनी कुंड्यापाणी येथील कथित पंचांना समक्ष बोलवून त्यांना मंजूर झालेल्या नवीन कायद्याची माहिती दिली. तर अंनिसच्या पदाधिकाºयांनी प्रबोधन करुन या अनिष्ट सामाजिक बहिष्काराच्या पध्दतीला पायबंद घालण्यासाठी बनविण्यात आलेल्या कायद्याबाबत पंचासह आदिवासी समुदायाचे उद्बोधन केले, आणि जातपंचायतीच्या जाचातून आदिवासी दाम्पत्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेत.गावकºयांनीही चूक मान्य करीत 'सामाजिक बहिष्कार' या अनिष्ट रुढीचे उच्चाटन करुन बाळू पावरा व त्याच्या पत्नीस यापुढे कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासन सपोनि जयपाल हिरे व अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिले. यावेळी रुपसिंग बारेला, वाहºया बारेला, वजीर बारेला, रेंमसिंग बारेला, किरना बारेला, सहाय्यक फौजदार विठ्ठल धनगर, हवालदार रविंद्र साळुंके आदींची उपस्थिती होती.
कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याची जातपंचायतीच्या जाचातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 6:49 PM
घटस्फोटानंतर पुन्हा संसार सुरू करणाºया चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देणाºया जात पंचायतीला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची वेळीच समज देऊन या प्रकरणी यशस्वी तोडगा काढण्यात यश मिळवले.
ठळक मुद्देघटस्फोटानंतर पुन्हा एकत्र संसार सुरू करणाºया आदिवासी दाम्पत्याची आपबितीअंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी पंचाना दिली वेळीच समजतब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया पंचासह आदिवासींचेही केले प्रबोधन