पाटणा उपकेंद्र रुग्णालयाच्या पाठीमागील भागात वीस ते बावीस एकर जागेवर गावातील धनदांडग्या व राजाश्रय प्राप्त काही लोकांनी कच्चे बांधकाम, तार कंपाऊंड व इतर प्रकारे बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहेत. या अतिक्रमणाला विरोध केल्यास या आदिवासींना संबंधित लोकांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते. या अतिक्रमण जागेवरून बकऱ्या नेल्यास प्रसंगी त्यांना मारहाण करतात. गावातील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचाही यात सहभाग आहे. हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. याला आळा घालण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून तत्काळ चौकशी होण्याचे आदेश व्हावेत व ही अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी या भागातील आदिवासी भिल्ल जमातीच्या नागरिकांनी केलेली आहे.
लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष
याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित लोकांनी अनेकवेळा लेखी तक्रारी करूनही आतापर्यंत साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. गटविकास अधिकारी अथवा विस्तार अधिकारी यांनी कुठलीही चौकशी केलेली नाही. या भिल्ल नागरिकांची व्यथाही जाणून घेतलेली नाही. संबंधित अधिकारी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या नागरिकांनी पत्रकाद्वारे केला आहे. त्यामुळेच आदिवासी नागरिकांनी त्या निषेधार्थ आंदोलन छेडले असा आरोप करण्यात आला आहे. या उपोषणात नारायण युवराज गायकवाड, ममता पिंटू माळी, सोमनाथ राजू गायकवाड, समाधान चैत्राम सोनवणे, मायाबाई नाना सोनवणे, बापू पंढरीनाथ सोनवणे, लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड, सरलाबाई दिलीप सोनवणे, लिलाबाई राजेंद्र गायकवाड, सुशिलाबाई सुरेश तलवारे, विठाबाई दिनकर तलवारे, सुषमा समाधान सोनवणे, बंटी भगवान तलवारे, रेखा दीपक सोनवणे, आदी सहभागी झाले.
फोटो मॅटर