लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु केअर युनिटला आग लागून जळून मृत्युमुखी पडलेल्या दहा कोवळ्या, निष्पाप बालकांना भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने सोमवारी सायंकाळी काव्यरत्नावली चौकात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, सरचिटणीस महेश जोशी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, उपाध्यक्ष सुभाष सोनवणे, सुशील हसवाणी, बापू ठाकरे, राहुल वाघ, प्रा.भगतसिंग निकम, निला चौधरी,अक्षय चौधरी, सुरेखा तायडे, डॉ.धर्मेंद्र पाटील, आनंद सपकाळे, जयश भावसार, लताताई बावसकर, प्रवीण जाधव, प्रमोद वाणी, दीपक बाविस्कर, संजय लुल्ला, संजय तिरमाले, भास्कर जुनागडे, अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जयंत चव्हाण, गौरव पाटील, अबोली पाटील, आकाश पाटील, प्रथम पाटील, राहुल जाधव आदींची उपस्थिती होती.