फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात १० नोव्हेंबर रोजी तंत्र व वैद्यशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सहकार महर्षी जीवराम तुकाराम महाजन यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.महाविद्यालयाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याला कृषी शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, मसाका अध्यक्ष शरद जीवराम महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, मानद सचिव विजय रघुनाथ झोपे, मानद सहसचिव मार्र्तंड गणपत भिरूड, नरेंद्र नारखेडे, प्रभाकर सोनवणे, गणेश नेहेते, लीलाधर चौधरी, शेखर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संचालक मंडळातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, आय.टी.आय., इंग्लिश मीडियम स्कूल व मसाकाचे सर्व संचालक व पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही समाधी स्थळावर पुष्पार्पण केले.यावेळी नीलेश राणे, अमोल भिरूड, नारायण चौधरी, डॉ.नरेंद्र कोल्हे, भानुदास चोपडे, प्रा.डॉ.व्ही.आर. पाटील , तंत्र व वैद्यकशिक्षण मंडळ सदस्य रामा परशुराम पाचपांडे, दामोदर केशव चौधरी, शशिकांत रामचंद्र चौधरी, विजयकुमार परदेशी, बी.व्ही.बोरोले, एस.एल.तळेले, बी.डी.चौधरी, आर.एन.ढाके, एस.इ. पाटील, एन.आर.झांबरे. जि.प.च्या माजी सदस्या आरती शरद महाजन, जी.पी.पाटील, सुभाष पाटील, संजय महाजन, नितीन चौधरी , बरसू रामदास नेहेते यांनी समाधी स्थळावर पुष्पार्पण करून श्रद्धाजली वाहिली.महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.नंदिनी चौधरी, उपप्राचार्य डॉ.आर.डी. पाटील, सर्व विभागप्रमुख डॉ.ए.एम.पाटील, प्रा.डॉ.एन.डी.नारखेडे, प्रा.आर.के.मालविया, प्रा.डी.ए.वारके, डॉ.डी.के.किरंगे, डीन डॉ.पी.एम.महाजन, तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.एस.झोपे, आयटीआय, प्राचार्य प्रा.प्रवीण फालक, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रा.नंदकिशोर सोनावणे व प्रा.सोसेस जाधव उपस्थित होते.समारोपप्रसंगी इंग्लिश मेडियम स्कूलचे विद्यार्थी व शिक्षकांनी जे.टी.महाजन यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला व भावगीते सादर केली.
फैजपूर येथे सहकार महर्षी जे.टी.महाजन यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 2:42 PM
जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात सहकार महर्षी जीवराम तुकाराम महाजन यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
ठळक मुद्देमान्यवरांनी दिला जीवनकार्याला उजाळाविद्यार्थ्यांनी सादर केली भावगीतेसर्व संचालक व पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही समाधी स्थळावर केले पुष्पार्पण