जळगाव : हाजी गफ्फार मलिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जनाजा ए नमाजमध्ये सहभाग न घेता आल्याने जळगाव मुस्लीम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे ऑनलाइन व प्रत्यक्ष शोकसभेचे आयोजन शनिवारी केले होते. त्या वेळी १११ संघटनांनी मलिक यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी मलिक यांचे पुत्र एजाज मलिक व त्यांचे लहान बंधू वहाब मलिक उपस्थित होते. या वेळी शहर ए काझी मुफ्ती आतिक उर रहमान अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक फारुक शेख यांनी केले. या वेळी अनेकांनी मलिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन डॉ. जावेद शेख यांनी केले. तसेच वडिलांनी केलेले कार्य यापुढे सुरू ठेवू, अशा भावना नदीम मलिक यांनी व्यक्त केल्या.
यांनी अर्पण केली श्रद्धांजली
मौलाना अब्दुल रहमान, मौलाना सलीक सलमान, मौलाना मुजम्मिल मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे मौलाना जाकीर, वहिदत इस्लामीचे जाकीर शेख, जमात-ए-इस्लामीचे मुस्ताक मिर्झा, मुफ्ती हारून व डॉ. राजीव जहागीरदार, अब्दुल करीम सालार, डॉ. अमानुल्लाह शहा, प्रा. इक्बाल शहा, अँग्लो उर्दूचे सय्यद चांद सय्यद आमीर, अमीन बादलीवाला, प्राचार्य बाबू शेख, प्रा. सोहेल शेख, मनसेचे जमील देशपांडे, जमील शेख, रईस बागवान, एमआयएमचे जिया बागवान, शिवसेनेचे इब्राहिम पटेल, जाकीर खान, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, मजहर खान, ॲड. अकील इस्माईल, ॲड, सलीम शेख, ॲड. आमीर शेख, ॲड. इस्माईल पटेल, शरीफ पटेल, ॲड. सलीम चित्रे, ॲड. एजाज खान, ॲड. शरीफ शेख, डॉ. जावेद खान, डॉ. मिन्हाज पटेल, इक्बाल मिर्जा, सय्यद मोहसीन, इफ्तेखार खान, सईद पटेल, मुकीम शेख, सगीर शेख, मुश्ताक करिमी, शफिक नाजिम, साबीर मुस्तफाबादी, अनिस कैफी, मुश्ताक साहिल, रफिक जिलानी, हमीद भुसावली, रफिक मारुलवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.