शेंदुर्णी, ता.जामनेर : प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णी त्रिविक्रम कडूजी महाराजांचा जयघोष करत २७४ वा रथोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. बुलढाणा, औरंगाबाद जळगाव जिल्ह्यातून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.गांधी चौकात असलेल्या रथ घरात शारदा भगत, हभप शांताराम महाराज भगत, जि.प. सदस्य सरोजनी गरुड, संजय गरुड, क्षितीजा गरुड, प्राजक्ता गरुड, डॉ.सागर गरुड, कमलबाई चौधरी, भागवत चौधरी, कस्तुरीबाई महाले, श्रीराम महाले, योगिता भगत, तुषार भगत यांनी सपत्नीक पूजा केली.रथ झेंडूंच्या गुलाबाच्या फुलांनी सजवलेला होता. यावर्षी लाकडी काम रंगरंगोटी झालेले असल्याने सुंदर आकर्षक दिसत होते. शेंदुणीर्चे धार्मिक वैभव असलेल्या रथ सोहळ्यात भजनी मंडळ होते. त्यांच्या पाठीमागे अश्वावर आरुढ हिंदू धर्माचा भगवा ध्वज, पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ व बैलगाड्यांवर देवी-देवतांचे हिंदू धर्मातील विविध साधू संतांचे बालगोपालांनी पोशाख परिधान करून सजीव आरास सादर केली होती. भगवान श्री त्रिविक्रम संत कडोजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात रथोत्सव उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.रथोत्सव मार्गात सिमेंटचे गट्टे बसवल्याने केळीच्या सालीवरून पाय घसरल्याने सौ मंगला उखा परदेशी लोंढेपुरा (शहापुरा) या गावातील पडल्याने गुडघ्याची वाटी सरकली त्यामुळे त्यांना तात्काळ पाचोरा येथे हलवण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
शेंदुर्णीच्या रथोत्सवात त्रिविक्रम व कडोजी महाराजांचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 9:37 PM
प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णी त्रिविक्रम कडूजी महाराजांचा जयघोष करत २७४ वा रथोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देऐक्याची भावना जपत भाविकांची मांदियाळीशेंदुर्णीच्या रथोत्सवाची २७४ वर्षांची परंपराशेंदुर्णी गावात धार्मिक व उत्साहाचे वातावरण