फैजपूर : प्रसिद्ध खंडोबा देवस्थान यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडेआली आहे..९ मार्च होळीपासून हा यात्रोत्सव सुरू होणार आहे. या ठिकाणी धार्मिक व कर्णछेदनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडत असतात.यात्रा निमित्त व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. देवस्थानावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. देवस्थानाचे प्रमुख महंत घनश्याम दासजी ब्रह्मचारी महाराज यांच्या निधनानंतर गेल्या दोन वषार्पासून या देवस्थानाची धुरा महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास जी ब्रह्मचारी महाराज सांभाळत आहे.९ तारखेपासून यात्रा सुरु होणार असली तरी १० रोजी या यात्रा उत्सव प्रारंभाचा कार्यक्रम देवस्थानतर्फे आखण्यात आला आहे. त्यानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शुभारंभ माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे.अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी असतील. खंडोबा महाराज यांची महापूजा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल तर वस्त्र अर्पण खासदार रक्षाखडसे करतील. शस्त्र अर्पण भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते होईल तर अस्र अर्पण पुणे येथील नामदेव ढाके हे करतील. व्याख्यानमालेस मॅगसेस पुरस्कार प्राप्त निलिमा मिश्रा यांचे वेद आश्रम व्यवस्था व ग्रामीण स्री रोजगार योजना तसेच प्राचार्य पाटील यांचे पुरुष संस्कृती आणि ज्ञानाची संस्कृती या विषयावर व्याख्यान होईल.
फैजपूर येथे खंडोबाची यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 4:45 PM