नशिराबाद, जि. जळगाव : अमरावती येथून रेडीमेड कपडे घेवून येणाऱ्या ट्रकला सोमवारी सकाळी नशिराबादजवळ अचानक आग लागली. त्यात ३० लाखाचे कपडे जळून खाक झाले असून चालक व क्लिनर बालंबाल बचावले आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमरावती येथून सागर रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (एम.एच १९ एक्स ६३२) रेडीमेड कपड्यांचा माल घेवून जळगावातील ताहेरी गोल्डन ट्रान्सपोर्ट याठिकाणी येत होता. महामर्गावरुनट्रकला अचानक आग लागली.यावेळी ट्रकची मागच्या बाजूने आगीच्या ज्वाला आकाशात उडत असल्याचे दिसताच नागरिकांनी ट्रकचालकाला आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रक चालक इरफान खान याने आग पाहताच तात्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला उतरविला. खड्ड्यात ट्रक पलटी होताच चालक व क्लिनर मदार खान याच्यासोबत उडी घेत आपला जीव वाचविला. यावेळी महामार्गावर सुरु असलेल्या चौपदीकरणाच्या ठिकाणचे टँकरचे चालक दिपक वंजारी यांनी पाण्याच्या टँकरने पाणी मारण्यास सुरुवात केली.धावत्या दुचाकीला आगशहरामधील स्वातंत्र्य चौकातील हॉटेल रूपाली समोर धावत्या दुचाकीला आग झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली़ या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे़ शहरातील मोरे आॅटो वर्क गॅरेजवर प्रकाश चौधरी यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एमएच़१९़ एक्स़६९८६ ही दुरूस्तीसाठी टाकली होती़दुचाकीसाठी आवश्यक पार्ट घेण्यासाठी गॅरेजवरील कर्मचारी रिजवान शेख हा दुचाकी घेऊन आॅटो पार्टच्या दुकानात जात असताना अचानक स्वातंत्र्य चौकात दुचाकीने पेट घेतला़दोन बंबांनी आग आटोक्यातधावत्या ट्रकला आग लागल्यामुळे नशिराबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जळगाव व भुसावळ येथील अग्निशामन बंबांना पाचारण केले. दरम्यान जळगाव येथील अग्निशामन बंब अवघ्या २० मिनिटात घटनास्थळी दाखल झाला. प्रदीप धनगर, गोकुळ सोनवणे, भगवान जाधव, जगदीश साळुंखे, भारत बारी यांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर भुसावळ औष्णीक विद्युत केंद्राच्या बंबांने पाण्याच्या मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
नशिराबादला कपड्यांच्या ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:12 PM