यावल : तालुक्यातील मनुदेवी येथून किनगाव मार्गे जळगावकडे जात असलेल्या एसटी बसला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालक जखमी झाले. अपघातात एसटी बसचे नुकसान झाले असल्याची फिर्याद यावल पोलीस ठाण्यात चालकाने दिल्यावरून ट्रकचालका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जळगाव आगाराची बस क्रमांक एमएच-२०,बीसी-२५११ ही मनुदेवी येथून किनगाव मार्गे जळगावकडे जात असताना किनगाव येथील वीज उपकेंद्राजवळ मागून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच-१८ एम ७१८६ वरील चालक नासीर रसीद पठाण रा.शिरपूर याने बसला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात एसटीचे चालक दत्तात्रय कोळी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातता एसटीचेही नकसान झाले आहे. चालकास दुखापत झाली यावरून ट्रक चालकाविरुध्द गुरनं. ९/२०१७ भादंवि कलम २७९, ३३७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)
ट्रकची एसटीला धडक, चालक जखमी
By admin | Published: January 17, 2017 11:35 PM