शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

रावेरजवळ बसला ट्रकची जबर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 2:17 AM

ट्रकने संगमनेर- रावेर या रातराणी बसला जोरदार धडक दिल्याने त्यात बसचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास रावेरनजीक घडला.

ठळक मुद्देबसचालकासह एक प्रवासी जखमीभल्या पहाटे रावेरजवळ घडला अपघात

रावेर : मालवाहू ट्रकने संगमनेर- रावेर या रातराणी बसला जोरदार धडक दिल्याने त्यात बसचालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास रावेरनजीक घडला.सावद्याकडे जाणाऱ्या ट्रकचे (क्र. एच एन. ३८/टी - ००४२) रस्त्यातील खड्डा चुकवतांना टायर फुटल्याने सावद्याहून रावेरकडे येत असलेल्या संगमनेर -रावेर रातराणी एस. टी. बसला (क्र. एम.एच - ४०/एन - ९०३८) चालक बाजूने जबर धडक दिल्याने बस चालक राजू हौसाजी आर्सुलवार (४०) रा. रावेर यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले. तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असून दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.हा अपघात रावेर शहरालगत सावदा रस्त्यावरील श्री बिजासन माता मंदिरासमोर घडला. याप्रकरणी रावेर पोलिसात पसार झालेल्या ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबाद - जळगाव महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने तब्बल दोन तास उशीराने धावणारी संगमनेर - रावेर बस ही सावद्याहून रावेरकडे येत असतांना विरूद्ध दिशेने आलेल्या ट्रकने समोरील एक टायर फुटल्याने खड्डा चुकवतांना बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचालकाच्या सीटसह पाठीमागील दुसºया क्रमांकाच्या प्रवासी सीटपर्यंत बसचा चुराडा झाला आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली मात्र बसचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीमागील सीटवरील प्रवासी शेख मुजाहीद शेख नुरमोहंम्मद (२२) रा. रावेर हा किरकोळ जखमी झाला आहे.बसवाहक भिमसिंग राठोड यांनी रावेर आगार व्यवस्थापक सतीश बंदरे व रावेर पोलीसात खबर दिल्याने पोलीस व बस आगारातील यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रस्त्यावरील वाहनचालक व लगतच्या हॉटेलवरील कामगार तथा प्रवाशांनी कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकास व प्रवाशाला बाहेर काढून रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यांचेवर प्राथमिक उपचार करून शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र चालकाची गंभीर स्थिती पाहून त्याला जळगावला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.