वाकोद, ता जामनेर : जळगाव - औरंगाबाद महामार्गावरील वाकोद बस स्टँड परिसरात शुक्रवार २८ रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून जळगावकडे नारळाने भरलेले पोते घेऊन जाणारा ट्रक क्रमांक ए. पी. १६ टी. वाय. ४३५५ चे वाकोद बस स्टँड परिसरात अचानक पुढचे टायर फुटून जळगाव कडून औरंगाबादकडे जाणाऱ्या मिनी ट्रकवर जोरदार धडकल्याने अपघात झाला. अपघातात ट्रकच्या कॅबीनचा चुराडा झालेला असून चालक त्यात अडकल्याने त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.वाकोद बस स्टॅड परिसरात हा अपघात झाल्यनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर कॅबीनमध्ये अड़कलेल्या चालकाला काढण्यासाठी गावकºयांनी प्रयत्न सुरु केले. मात्र कॅबीनचा चुराडा झाल्याने चालकाला काढणे अवघड झाले होते. शेवटी जेसीबी मशीन बोलून कॅबीनचा पत्रा वाकवून तसेच गाडीचे स्टेरिंग कापून चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताच्या धक्क्याने प्रचंड घाबरल्याने चालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याला किरकोळ मार बसला आहे.ग्रामस्थांची मदतीसाठी धावहा अपघात बस स्टँड परिसरात झाल्याने टायर फुटण्याचा आवाज आणि समोरून येणाºया गाड़ीवर ट्रक आदळल्याने सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. कॅबिनमध्ये चालक अडकल्याचे पाहुन मिळेल ती मदत गावकºयांनी सुरु केली. मात्र चालक कॅबिनमध्ये अडकला असल्याने त्याला सुरक्षित काढण्यासाठी तत्काळ जेसीबी मशीन बोलावून पत्रा वाकविण्यात आला. त्यानंतर स्टेअरींग कापून चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांमुळे चालकाला जीवनदान मिळाले. सर्वत्र रस्त्याचे कामे सुरु असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सर्वत्र रस्त्यावर धुळीचा सामना करावा लागत असल्याने वाहन धारकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
वाकोद येथे ट्रकचे टायर फुटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 4:46 PM
वाकोद बस स्टँड परिसरात अचानक पुढचे टायर फुटून जळगाव कडून औरंगाबादकडे जाणाऱ्या मिनी ट्रकवर जोरदार धडकल्याने अपघात झाला.
ठळक मुद्देग्रामस्थांच्या मदतीने चालकाला वाचविण्याचे प्रयत्नट्रकमध्ये भरलेले होते नारळाचे पोतेवाकोद ग्रामस्थांच्या मदतीमुळे वाचले चालकाचे प्राण