विजय सैतवालजळगाव : योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो. या योग साधनेमुळेच आपण नृत्य स्पर्धा असो की शालेय शिक्षण यात यशस्वी होऊ शकलो, असे मत देशपातळीवरील नृत्य स्पर्धेतील विजेता तनय मल्हारा याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दिवसेंदिवस योगाचे महत्त्व वाढत असून सुमारे २५०० वर्षांपूर्वीची ही योगसाधना जागतिक पातळीवर पोहचली आहे. याच योग विद्येची साधना करून जळगावातील तनय मल्हारा याने योग स्पर्धेत विविध पुरस्कार तर मिळविलेच सोबतच त्याने खाजगी दूरचित्रवाणीवरील राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत बाजी मारली. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून सर्वांना योग साधना करण्याचे आवाहन केले.सातत्य महत्त्वाचेगेल्या साडेतीन वर्षांपासून आपण योगा करीत असून यामुळे आपले शरीर लवचिक होण्यास मदत मिळत आहे. योगामुळे शारीरिक व मानसिक विकास होण्यास मोठी मदत होते. सोबतच आपण मानसिक समतोल राखू शकतो, असे तनय मल्हाराचे म्हणणे आहे. त्यासाठी सातत्यही महत्त्वाचे असल्याचे तनय सांगतो.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धडकयोग साधक तनय मल्हारा याने विविध आंतरराष्ट्रीय योगस्पर्धेत सहभाग घेत विविध पदक मिळविले आहे. सिंगापूर येथे झालेल्या एशियन योगा चॅम्पियनशीप स्पर्धेत ३ सुवर्ण, एक ब्रॉंझ पदक मिळविले. याशिवाय नॅशनल योगा स्पोर्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत एक रजत, एक ब्राँझ, एक सुवर्ण पजक मिळविले आहे. या सोबतच त्याची व्हिएतनाम येथे झालेल्या एशियन योगा चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली होती, मात्र तो जाऊ शकला नव्हता. हे सर्व यश योगाचे असल्याचे तनयचे म्हणणे आहे. तनय सोबतच त्याचे वडील आनंद मल्हारा व आई डॉ. नलिनी मल्हारा यादेखील योगाचे महत्त्व इतरांना पटवून देत आहेत.योगामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण एकाग्रता ठेवू शकतो. मी नृत्य स्पर्धेत विजयी ठरलो. सोबतच अभ्यास करण्यासाठीही मला योगाची मदत झाली. एकाग्रता साधून मी इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकलो, असेही तनयचे म्हणणे आहे.योगामुळे सर्वांना शारीरिक, मानसिक फायदे तर होतात, ते मलाही झाले. मात्र यासोबतच मला नृत्यासाठीही त्याची मोठी मदत झाली. आपली आवड असलेल्या नृत्यात सातत्य राखणे व नृत्य स्पर्धा जिंकणे यासाठी मला योगाची मोठी मदत झाल्याचे तनयचे म्हणणे आहे. मी जे नृत्य करतो, त्याची एक वेगळीच पद्धत असून ते नृत्य योगाशिवाय शक्य नाही. नृत्यातील या अनोख्या सांगडमुळे आपण यशाचा टप्पा गाठू शकलो, असेही तनयचे म्हणणे आहे.
योग साधनेतच यशाचे खरे गमक : तनय मल्हारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:28 PM
योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो. या योग साधनेमुळेच आपण नृत्य स्पर्धा असो की शालेय शिक्षण यात यशस्वी होऊ शकलो, असे मत देशपातळीवरील नृत्य स्पर्धेतील विजेता तनय मल्हारा याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ठळक मुद्देयोगासनामुळे व्यापक व समतोल विकास शक्यआई-वडीलही देताहेत योगाचा संदेशयोगामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धडक