जळगाव : ‘ट्रू जेट’ या विमान कंपनीने जळगाव ते मुंबई सेवा देण्यास तयारी दर्शविली असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत सेवा सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती या कंपनीच्या सूत्रांनी दिली दिली.गेल्या चार महिन्यापासून बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरु होणार असून, उड्डाण योजने अंतर्गंत तिसऱ्या टप्प्यांत ‘ट्रू जेट’ ही विमान कंपनी जळगाव ते मुंबई विमानसेवा देणार आहे. याबाबत शासनाचे जळगाव विमानतळ प्राधिकरण प्रशासनाला नुकतेच आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच दुसºया टप्प्यांत ट्रू जेटने जळगाव-अहमदाबाद सेवा सुरु करण्याचीदेखील तयारी दर्शविली आहे. मात्र, सेवेची तारीख निश्चित केलीली नाही. या सेवे संदर्भात ट्रू जेटच्या हैदराबाद येथील अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी जळगाव ते मुंबई सेवा सुरु करण्याचे आमचे नियोजन ठरले आहे मात्र, फेब्रुवारी महिन्यात सेवा सुरु करण्याचे कुठलेही नियोजन झालेले नसून, मार्चच्या पहिल्या आठवड्यांत सेवा सुरु करण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले.लवकरच अधिकारी नियुक्त होणारजळगाव विमानतळावर कंपनीच्या पुढील प्रशासकीय कामकाजासाठी लवकरच ट्रू जेट कंपनीमार्फत एका अधिकाºयाची नियुक्ती केली जाणार आहे.
‘ट्रू जेट’ची सेवा मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:03 AM
गेल्या चार महिन्यापासून बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरु होणार
ठळक मुद्देलवकरच अधिकारी नियुक्त होणार