भुसावळ : इनरव्हील क्लबतर्फे इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लॉझम स्थापन करण्यात आले. ब्लाँझम क्लबच्या चार्टर्ड अकाउंटंटपदी तृप्ती नागोरी यांनी पदभार स्वीकारला. क्लबचा चार्टर प्रेझेन्टेशन समारोह उत्साहात पार पडला.
समारंभाचे प्रमुख पाहुणे असोसिएशन सीसीसीसी डॉ. रश्मी शर्मा होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीडीसी रत्नकांता अग्रवाल होत्या. इनरव्हील क्लब भुसावळ प्रेसिडेंट शीतल भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुचिका शर्मा, मनीषा तायडे, स्मिता बियाणी, राजश्री कात्यायनी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
ब्लॉसम क्लबच्या चार्टर अध्यक्ष तृप्ती नागोरी यांनी पदभार स्वीकारून आपल्या नवीन कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांच्या नावांची घोषणा केली. इनरव्हीलच्या घोषवाक्यानुसार आम्ही महिलांकरिता, गरजू लोकांकरिता आणि पर्यावरणासाठी आवश्यक ते प्रकल्प करू, असे मनोगत अध्यक्ष तृप्ती नागोरी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात रुचिका अग्रवाल, रितिका हेडा, गीतिका दरगड, नीशा मंडलेचा यांच्या स्वागत गीताने झाली. कीर्ती काबरा, संजीवनी लाहोटी, रितिका हेडा, दीपा पटेल यांनी सुंदर नृत्याद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले.
सभागृहाचे सजावटी काम श्रुती लाहोटी यांनी पाहिले.
सूत्रसंचालन ईशा मनवानी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता राखी भराडे यांच्यासह इतरांचे सहकार्य लाभले.