चाळीसगाव : गेल्या पाच दिवसापासून तूर डाळ खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्राच्या गेटला कुलूप असल्याने शेतकºयांचा माल गेटबाहेरच पडून आहे. शिवाय दररोज या ठिकाणी चोºयाही होत आहेत. त्यामुळे आपापला माल सांभाळण्यासाठी शेतकरी भर ऊन्हात पाच दिवसापासून येथेच तळ ठोकून होत आहेत. या सर्व कारणांमुळे शेतकरी हैराण झाला आहे. तूर डाळ खरेदी करण्यासाठी शासनाने २२ एप्रिलपर्यंत मुदत जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराजवळ तूरडाळ खरेदी केंद्र सुरु केले आहे. १५ रोजी शेतकºयांनी तूरडाळ खरेदी केंद्रात विकण्यासाठी आणली. या दिवशी बारदान नाही म्हणून तूरडाळ खरेदी झाली नाही. यानंतर दुसºया व तिसºया दिवशी बारदान येऊनही खरेदी झाली नाही. चवथ्या व पाचव्या दिवशी कर्मचारी नाही या कारणावरून खरेदी बंद ठेवण्यात आली. दररोज वेगवेगळी कारणे दाखवून हे केंद्र बंद राहात असल्याने शेतकºयांना आपला माल सांभाळण्यासाठी भर उन्हात व रात्रभर पहारा देत थांबावे लागले. १९ रोजी तूरडाळ केंद्राला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता या केंद्राच्या गेटलाच कुलूप ठोकलेले होते. तेथे एकही अधिकारी अथवा कर्मचारी, हमालदेखील नव्हता. रोज वेगवेगळी कारणे सांगून केंद्र बंद ठेवून चालढकल केली जात आहे. यामुळे शेतकºयांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाच दिवस उलटूनही कोणीही याची दखल घेतलेली नाही. अजून किती दिवस केंद्र सुरू होण्याची वाट पाहायची असे सांगून शेतकºयांनी या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.पाच दिवसापासून शेतकºयांचा माल उघडा पडून आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाणही वाढले आहे. शेतकºयांच्या मालाला संरक्षण नाही. आधीच १५-२० दिवसापासून तापमानात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यात या मालाच्या संरक्षणासाठी भर उन्हात शेतकºयांना जागता पहारा द्यावा लागत आहे. पाच दिवसात एकही पदाधिकारी, कार्यकर्ता तेथे फिरकला नाही. शेतकºयांचे कैवारी असल्याचा आव आणायचा मात्र शेतकºयांच्या अडचणीला कोणीही पुढे आले नाही याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे धावकृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील यांना हा प्रकार कळताच त्यांनी याबाबत शेतकी संघ अधिकारी यांच्याशी चर्चा केली . नंतर ही बाब आमदार उन्मेष पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यांच्याच भ्रमणध्वनीद्वारा अनेक शेतकºयांनी आपली कैफियत मांडली. तहसीलदार यांना तत्काळ घटनास्थळी पाठवून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार पाटील यांनी शेतकºयांना दिले.नायब तहसीलदारांची धावनायब तहसीलदार विशाल सोनवणे हे बुधवारी दुपारी दीड वाजेनंतर केंद्रात दाखल झाले. त्यांनी शेतकी संघाचे कारकून विकास पाटील यांची कानउघाडणी केली आणि केंद्राच्या गेटला असलेले कुलूप उघडण्यास सांगितले. नंतर लगेच शेतकºयांचा मोजण्यास सांगितले परंतु कर्मचारी व हमाल नाही. गुरुवारी शेतकºयांचा माल मोजला जाईल असेही सांगण्यात आले. व्यापाºयांची लिंक२०-२५ व्यापारी कार्यरत असताना लिलाव प्रक्रियेत मात्र दोनच व्यापारी शेतकºयांचा माल घेतात. इतर व्यापारी येत नसले तरी ते परस्पर या दोघा व्यापाºयांशी संगनमत करुन परस्पर मालाची वाटणी करून घेतात. अशा प्रकारे व्यापाºयांची लिंक लावली आहे. शेतकºयांचा माल लिलावाद्वारे घेत असल्याचा आरोप अनेक शेतकºयांनी केला आहे. (वार्ताहर)
मुदतीआधीच तूरडाळ खरेदी केंद्र बंद
By admin | Published: April 20, 2017 12:29 AM