आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - शहरातील मनपाने मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांवर दंड आणि लिलावाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुध्द गाळेधारकांनी मंगळवारपासून बंद पुकारला असून, मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने गाळेधारकांचा प्रश्न लक्षात घेऊन मूक मोर्चाला पाठिंबा दिला असून, मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा यांनी दिली आहे.गाळेधारकांच्या प्रश्नावर शनिवारी व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये व्यापारी महामंडळानेदेखील सर्व गाळेधारकांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे निश्चित केले. व्यापारी महामंडळाशी संलग्न असलेली सर्व प्रतिष्ठाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.शासनाने सहानुभूतीपूर्वक तोडगा काढावाजळगावात मोठा व्यापारी वर्ग असून दंडात्मक कारवाई आणि ई-लिलाव हा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शहरातील हजारो व्यापारी यामुळे अडचणीत सापडले आहे. शासनाने योग्य ती बाजू समजून घेत व्यापाºयांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यापारी महामंडळ सचिव ललित बरडीया यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.दरम्यान, गाळेधारकांच्या बंदला दाणाबाजार असोसिएशनचा पाठिंबा असून गाळेधारकांच्या मोर्चात असोसिएशन सहभागीदेखील होणार आहे. मात्र दाणाबाजार असोसिएशनची दुकाने सुरूच राहणार असल्याचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत व्यापारी आस्थापना बंद ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:48 PM
बैठकीत निर्णय
ठळक मुद्देगाळेधारकांच्या मूक मोर्चास व्यापारी महामंडळाचा पाठिंबाशासनाने सहानुभूतीपूर्वक तोडगा काढावा