तळेगाव, ता.जामनेर, जि.जळगाव : येथील श्वेतांबर श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व चोरडिया परिवारातील पूज्य श्री कौशल मुनिजी म.सा. (उर्फ चंद्रभान कपूरचंद चोरडिया) यांचे पुत्र तुषार चंद्रभान चोरडिया यांनी श्रमण संघीय मंत्री राष्ट्रसंत पूज्य श्री कमल मुनीजी म.सा. कमलेश यांच्या सानिध्यात दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दीक्षेचा कार्यक्रम धर्मनगरी, वल्लभनगर, राजस्थान येथे ६ डिसेंबर रोजी होत आहे.तुषार हे तळेगावातील चोरडिया परिवारातील एक हुशार, जिद्दी व सुस्वभावी व्यक्तिमत्त्व आहे. जी गोष्ट मनात धरली ती आजपर्यंत पूर्ण केली आहे. भक्तीमार्गात एवढे लिन झाले की त्यांनी तळेगावनगरीचे नाव एका विशिष्ट उंचीवर आणून ठेवले आहे.त्याच भक्तीमार्गात त्यांचे वडील पूज्य श्री कौशल्य मुनी म.सा.जी, त्यांची मोठी बहीण साध्वी पूज्य श्री उपासना जी म.सा.जी, लहान बहीण साध्वी पूज्य नवकीर्ती जी म.सा. जी., त्यांची आई शशिकला चंद्रभान चोरडीया यांनीसुद्धा त्याच धर्मक्षेत्रात आतापर्यंत लीन झाली आहे. हे श्री भगवान महावीरानी ‘जिओ और जिने दो’चा संदेश जो दिला तो ऐकून चोरडिया परिवाराने नाव रोशन केले. क्रोध, मोह , माया , लोभ, संपूर्ण त्याग करून पूर्ण परिवाराने समाजसेवेचा वसा घेतला.हा कार्यक्रम श्री मोतीकृष्ण गोधाम, करनपूर रोड, वल्लभनगर, राजस्थान येथे होत आहे. तुषार चोरडिया त्यांनी जो मार्ग स्वीकारला त्याबद्दल तळेगाव जैन संघ तसेच ग्रामस्थांंनी त्यांचा गौरव केला.तप, त्याग, साधनेमध्ये कुठेही मागे न राहता आपल्या आत्म्याचे व जीवनाचे कल्याण करावे, अशा तळेगाव, शेळगाव ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बहुतांशी ग्रामस्थ व समाजबांधव या दीक्षा महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, जय गजानन महाराज बहुउदेशीय संस्था तळेगाव, शेळगाव यांच्यातर्फे गौरव करण्यात आले.
तळेगाव येथील तुषार चोरडिया यांचा उद्या दीक्षा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 3:15 PM
तुषार चंद्रभान चोरडिया यांनी श्रमण संघीय मंत्री राष्ट्रसंत पूज्य श्री कमल मुनीजी म.सा. कमलेश यांच्या सानिध्यात दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दीक्षेचा कार्यक्रम धर्मनगरी, वल्लभनगर, राजस्थान येथे ६ डिसेंबर रोजी होत आहे.
ठळक मुद्देसंपूर्ण चोरडिया परिवाराने घेतला समाज सेवेचा वसातळेगाववासी दीक्षा महोत्सवाला राहणार उपस्थितविविध संस्थांतर्फे चोरडिया परिवाराचा सन्मान