चोपडा, जि.जळगाव : वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर दु:खद परिस्थितीतही दीपक सुरेश बोरसे या विद्यार्थ्याने २ रोजी बारावीचा जीवशास्त्र विषयाचा बोर्डाचा पेपर दिला.पंकज विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी दीपक बोरसे याचे वडील सुरेश शांतीलाल बोरसे यांचे २ रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मध्य प्रदेशातील वरला येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. डोक्यावर डोंगराएवढे दु:ख कोसळले असताना दीपकने हिंमत खचू न देता, बोर्डाचा पूर्व नियोजित जीवशास्र विषयाचा सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत पेपर दिला. हा पेपर त्याने महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दिला.या वेळी उपकेंद्रसंचालक व पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय. पाटील, प्रा.एस.पी.पाटील, प्रा.एन.बी.शिरसाठ यांनी या विद्यार्थ्यांचे सांत्वन केले.मृत सुरेश बोरसे यांच्या पश्चात पत्नी संगीता बोरसे, मुलगी अर्चना बोरसे असा परिवार आहे.
वडिलांचे निधन अन् मुलाने दिला बारावीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 4:34 PM
वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर दु:खद परिस्थितीतही दीपक सुरेश बोरसे या विद्यार्थ्याने २ रोजी बारावीचा जीवशास्त्र विषयाचा बोर्डाचा पेपर दिला.
ठळक मुद्देअंत्ययात्रा आटोपली मध्य प्रदेशातपरीक्षा केंद्रचालकांनी केले सांत्वन