जळगाव : कोरोनाचा संसर्ग जळगाव शहर व जिल्ह्यात मोठ्या झपाट्याने वाढत असून जळगाव शहरात नवल कॉलनी या परिसरात शेजारी-शेजारी राहत असलेल्या एकाच कुटुंबातील १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत़ आधीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात हे नातेवाईक होते़ यासोबतच आणखी एका भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे़ त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या १५६ वर पोहचली आहे़शहरात नवनवीन भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव होत असल्याने संसर्गाचा धोका अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे़ नवल कॉलनीत दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण आढळून आला होता़ त्याच्या हायरिस्क व लो रिस्क असे संपर्कातील शेजारील सर्व व्यक्तिंना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते़ त्यांचे अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाल्यानंतर यातील १२ जण बाधित आढळून आले आहे़ तसेच चार ते पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे़गेल्या तीन दिवसात १६९ रुग्णगेल्या तीन दिवसात कोरोनाचा कहर अधिकच वाढला आहे़ या तीनच दिवसांमध्ये तब्बल १६९ कोरोना बाधित रुग्ण जिल्हाभरात आढळून आले आहे़ यात भुसावळ व जळगावात सर्वाधिक रुग्ण असल्याचे चित्र आहे़ जळगाव तालुक्यातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे़ यात २८ मे रोजी ४८, २९ मे रोजी ५०, ३० मे रोजी ६८ रुग्ण आढळून आलेले आहेत़मृतांची संख्याही वाढतीचगेल्या काहीच दिवसात मृतांची संख्या ७७ वर पोहचली आहे़ जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या महितीनुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत भुसावळात सर्वाधिक २३ तर अमळनेर १३ व जळगाव ११ जणांच्या मृत्यची नोंद होती़ गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये दररोज चार ते पाच बाधितांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे़कोरोना रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलनवेळेवर वेतन व सुरक्षा यासाठी सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता़ सकाळी सर्व कर्मचाºयांनी एकत्र जमून हे आंदोलन पुकारले अखेर संबंधित ठेकेदारासोबत झालेल्या चर्चेनंतर व आश्वासनानंतर एक ते दीड तासांनी हे आंदोलन मागे घेत कर्मचारी कामावर परतले़
जळगावातील एकाच कुटुंबातील बारा जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:54 PM