जळगाव : धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणा-या तरुणीची सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ओळख पटली आहे. गायना सुनील खैरनार (१८) असे तिचे नाव असून ती पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीतील रहिवाशी व बेंडाळे महाविद्यायाची बारावीची विद्यार्थीनी होती. दरम्यान, तरुणीची ओळख पटली असली तरी आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. बजरंग बोगद्यानजीकच्या अप रेल्वलाईनवर खांबा क्रमांक ४१८/८-१० जवळ धावत्या सचखंड एक्सप्रेसच्या समोर गायना खैरनार हिने झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली होती. दरम्यान, अंगात टी शर्ट व हाप पॅन्ट परिधान केलेली होती. जवळ मोबाईल किंवा ओळख स्पष्ट होईल अशी काहीच वस्तू आढळून आली नव्हती. त्यामुळे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.अशी पटली ओळखगायना रविवार सकाळपासून घरातून गेल्याने कुटुंबाने तिचा सर्वत्र शोध घेतला. पनवेल येथे रिलायन्स कंपनीत असलेले वडील सुनील गोपाळ खैरनार हे देखील तातडीने घरी दाखल झाले. रविवारी रात्री त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनलाही जावून चौकशी केली, मात्र तेथेही काहीच माहिती मिळाली नाही. सोमवारी सकाळी ‘लोकमत’ मध्ये रेल्वेखाली तरुणीची आत्महत्या असे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त तरुणीचे मामा निंबा सोनवणे यांची वाचले. त्यांनी मुलीचे काका आत्माराम खैरनार व शेजारी राहणारे पोलीस कर्मचारी अतुल पाटील यांना सोबत घेऊन थेट जिल्हा रुग्णालय गाठले. शवविच्छेदनगृहात गेल्यावर चेहºयाचा चेंदामेंदा झाला होता, मात्र कपड्यांवर तिची आळख पटली.
जळगावात रेल्वेखाली आत्महत्या करणारी तरुणी बारावीची विद्यार्थिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 9:58 PM
धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणा-या तरुणीची सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ओळख पटली आहे. गायना सुनील खैरनार (१८) असे तिचे नाव असून ती पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीतील रहिवाशी व बेंडाळे महाविद्यायाची बारावीची विद्यार्थीनी होती. दरम्यान, तरुणीची ओळख पटली असली तरी आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
ठळक मुद्दे ‘लोकमत’मुळे पटली ओळख कारण मात्र अस्पष्टच