जळगाव : दुकान फोडून चोरट्यांनी लांबविलेली २ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या हातून परत मिळताच दुकान मालकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोलिसांविषयी असलेला गैरसमज या आनंदाच्या घटनेतून दूर झाला व त्यांच्याविषयी आणखीन आपुलकी वाढल्याची भावना दुकान मालकाने व्यक्त केली.बळीराम पेठेतील सुभाष तुलसीदास कुकरेजा (रा.सिंधी कॉलनी) यांच्या मालकीचे ओम स्पोटर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी १७ जुलै रोजी २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड व काही साहित्य लांबविले होते. चोरी करताना दोन जण सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे, सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, कैलास चौधरी, हवालदार विजय निकुंभ, रतन गिते यांच्या पथकाने दोन्ही संशयितांचा शोध घेऊन अटक केली होती. त्यांच्याकडून ही रक्कमही हस्तगत करण्यात पथकाला यश आले होते. न्यायालयीन पुर्तता झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या हस्ते सुभाष कुकरेजा यांना संपूर्ण रोकड परत देण्यात आली. यावेळी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे, सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, कैलास चौधरी, हवालदार विजय निकुंभ, रतन गिते आदी उपस्थित होते.
चोरी झालेले अडीच लाख परत मिळताच तरळले आनंदाश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 9:29 PM
दुकान फोडून चोरट्यांनी लांबविलेली २ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम पोलिसांच्या हातून परत मिळताच दुकान मालकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोलिसांविषयी असलेला गैरसमज या आनंदाच्या घटनेतून दूर झाला व त्यांच्याविषयी आणखीन आपुलकी वाढल्याची भावना दुकान मालकाने व्यक्त केली.
ठळक मुद्दे पोलिसांनी परत केली रक्कमचोरट्यांनी फोडले होते दुकान