आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११ : चाळीसगाव शहरातील कंत्राटदार सूर्यकांत यशवंतराव पवार (वय ६० रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) यांच्याकडे २२ हजाराची घरफोडी करणाºया दीपक मधूकर भोई (वय २२ रा.खरजई, ता.चाळीसगाव) व आकाश उर्फ अक्षय भानुदास पाटील (वय २३, रा. लक्ष्मी नगर, चाळीसगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री संयुक्तरित्या पकडले. २८ मार्च रोजी रात्री पवार यांच्याकडे घरफोडी झाली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव शहर पोलिसांचे संयुक्त पथक नेमले होते.विजय पाटील, महेश पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, अशोक पाटील व चाळीसगाव शहरचे बापुराव भोसले, संदीप तहसीलदार, नितीन पाटील व विनोद भोई यांच्या पथकाने दीपक व आकाश या दोघांना पकडले. आकाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.
चाळीसगाव शहरात घरफोडी करणा-या दोघांना गुन्हेगारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:33 PM
चाळीसगाव शहरातील कंत्राटदार सूर्यकांत यशवंतराव पवार (वय ६० रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) यांच्याकडे २२ हजाराची घरफोडी करणा-या दीपक मधूकर भोई (वय २२ रा.खरजई, ता.चाळीसगाव) व आकाश उर्फ अक्षय भानुदास पाटील (वय २३, रा. लक्ष्मी नगर, चाळीसगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री संयुक्तरित्या पकडले.
ठळक मुद्दे कंत्राटदाराकडे केली होती घरफोडी२२ हजाराचा ऐवज लुटला होता एलसीबी व चाळीसगाव पोलिसांची कारवाई