जळगाव : पंखा दुरुस्तीच्या दुकानात जात असलेल्या महेंद्र अम्रीत मंडल (३८,मुळ रा.नकटोली मंगरोली, ता.जि.मधुबनी, बिहार ह.मु.पोलीस लाईन, सुप्रीम कॉलनी) या तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करुन खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याच्या घटनेत दिनकर उर्फ पिन्या रमेश चव्हाण (२२,सुप्रीम कॉलनी) व सोनुसिंग उर्फ सोनू रमेश राठोड (रा.सुप्रीम कॉलनी) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पिन्या याला सोमवारी रात्री तर सोनू याला मंगळवारी अटक करण्यात आली.या दोघांनी रविवारी रात्री साडे आठ वाजता सुप्रीम कॉलनीतील रिक्षा थांब्याजवळ मंडल याला मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील, सचिन पाटील, योगेश बारी व मुकेश पाटील यांच्या पथकाने दोघांना अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी सोनू याने सिंधी कॉलनीतून चोरी केली आहे, ती दुचाकी जप्त करण्यात आली. पिन्या याला न्यायालयात हजर केले असता न्या.अक्षी जैन यांनी त्याची पोलीस कोठडीचा हक्क राखून कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पिन्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत.मांस फेकणाऱ्यास अटकबैलाची कत्तल करुन त्याची कातडी, मासांचे तुकडे व शिंगे उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी कुरेशी इकबाल शेख गफुर (४८, रा. इस्लामपुरा भवानी पेठ) यास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
जबरी लुटीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:04 PM