जळगाव : एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीतून अडीच लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या चोरी प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी सुपरवायझर जितेंद्र प्रदीप चौधरी (वय ३१, रा. इंद्रजीत सोसायटी) व हितेश प्रभाकर कोल्हे (वय ३०, रा. आसोदा) या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
स्पेक्ट्रम कंपनीतून अडीच लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या चोरी झाल्याचा प्रकार २० जून रोजी उघड झाला होता.
या गुन्ह्यातील रिक्षाचालक दीपक यशवंत चौधरी (वय ३८, रा. टहाकळी, ता. धरणगाव) याला दुसऱ्याच दिवशी अटक केली होती. तर सुपरवायझर जितेंद्र प्रदीप चौधरी व हितेश प्रभाकर कोल्हे हे दोघं जण फरार झाले होते. सुरक्षारक्षक कोळी याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दोघं शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, गफूर तडवी, सचिन पाटील, मुकेश पाटील व किशोर पाटील यांनी त्यांना ताब्यात घेतले. दुपारी न्या.ए एस शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.