जळगाव : शनीपेठ हद्दीतील काळे पेट्रोलपंप परिसरातील दोन ट्रक्टरच्या साडेआठ हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रीक बॅटरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून गुरुवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र प्रल्हाद काळे (वय ४८,रा. गांधी नगर) यांचा पेट्रोल पंपचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर (क्र.एमएच १९ पी ३५११) आणि (क्र.एमएच १९ पी ६७५) आहेत. काळे पेट्रोल पंपाच्या खळ्यात त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी दोन्ही ट्रॅक्टर पार्किंगला लावले होते. सकाळी ८ ते दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही ट्रक्टरच्या ७ हजार ५०० रूपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरी झाल्याचे लक्षात आले.
ट्रक्टरच्या दोन बॅटऱ्या लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 20:54 IST