जळगाव : कांचन नगर, पिंप्राळ्यातील संत मिराबाई नगरापाठोपाठ हनुमान नगरातही शुक्रवारी दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार घडल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र अशा प्रकरणांमध्ये तपास करण्यात पोलीस प्रशासनाला अद्यापही यश येऊ शकलेले नाही. असा माथेफिरूपणा करणारे कोण? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.दोन दुचाकी जाळल्याशहरात हुनमान नगरात अज्ञात माथेफिरुंनी घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी जाळून टाकल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.शहरातील रामेश्वर कॉलनी हनुमान नगर भागात संजय रंगराव रंगारी यांनी घरासमोरच दुचाकी (क्र. एम.एच १९ ए.आर.६९०२) लावली होती. रात्री १२ ते १ वाजेदरम्यान दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या कामगारांनी रंगारी यांना उठविले. त्यांनी पत्नीसह दुचाकीवर पाणी मारले व दुचाकी विझविली.रंगारी यांनी काही खोल्या ह्या भाड्याने दिल्या आहेत. त्यात पूजा कोळी ह्या बँक कर्मचारी आपल्या बहिणीसह राहतात. पूजा यांची दुचाकी जाळली.प्रकार लक्षात आला तोपर्यत कोळी यांच्या दुचाकीची राखरांगोळी झालेली होती. दोन वषार्पूर्वी त्यांनी दुचाकी घेतली होती.सातत्याने घडणाºया घटनांमुळे दहशतशहरात वाहने जाळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंप्राळा उपनगरात संत मिराबाई नगरात जगदीश मधुकर कुळकर्णी (३४) यांच्या मालकीची दुचाकी एका माथेफिरुने पेटविल्याची घटना घडली होेती तर त्यापूर्वी शिवाजीनगर व कांचननगरात मध्यरात्री दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. यात शिवाजीनगर येथील सलीम मजीद खान व त्यांचे भाऊ यांच्या दोघांच्या दुचाकी जाळल्या होत्या. याचदिवशी रात्री कांचननगरात ईश्वर नारायण राजपूत व त्यांचा मुलगा विक्की राजपूत या दोघांच्या दुचाकी जाळल्या होत्या. या घटना शहरात सातत्याने घडत आहेत मात्र अशी कृत्ये करणाºया माथेफिरूंचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
दोन दुचाकी जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:32 PM
माथेफिरूचे कृत्य
ठळक मुद्दे यापूर्वीच्या घटनांचा तपास लागेना