धुळे : राष्ट्रीय नागरी शहरी आरोग्य अभियानांतर्गत प्रभातनगर व समतानगर भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ठेका रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी 6 जानेवारीला प्रसिध्द केले होत़े दरम्यान, आरोग्य केंद्रांचा ठेका रद्द केल्यास आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका कशीश उदासी व नलिनी वाडिले यांनी दिला आह़ेनगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्याची पत्र आयुक्त संगीता धायगुडे यांना देण्यात आली आह़े राष्ट्रीय आरोग्य नागरी अभियानांतर्गत समतानगर, नंदी रोडवरील मनपा शाळा क्रमांक 51 व 52 आणि प्रभातनगर सव्र्हे क्रमांक 111, 112 या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी 43 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आह़े त्यानुसार तीनही आरोग्य केंद्रांसाठी निविदा मागवून कार्यादेश देण्यात आले आहेत़ नंदीरोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असले तरी समतानगर व प्रभातनगरातील आरोग्य केंद्राचे काम मात्र अजूनही सुरू होऊ शकलेले नाही़ विशेष म्हणजे सदर तीनही आरोग्य केंद्रांचे काम एकाच ठेकेदाराकडून असून संबंधित ठेकेदाराला केवळ एकाच आरोग्य केंद्राचे लाईनआऊट व डिझाईन देण्यात आल़े त्यानुसार एका आरोग्य केंद्राचे काम सुरू आह़े तर उर्वरित दोन आरोग्य केंद्रांसाठी ठेकेदाराने सहा वेळा पत्र देऊन मागणी केल्यानंतरदेखील लाईनआऊट, डिझाईन देण्यात आलेले नाही़ यादरम्यान बांधकामांसाठी असलेली चार महिन्यांची मुदत संपुष्टात येऊनही ठेकेदाराने काम न केल्याने ठेका रद्द करण्याची मागणी नगरसेवक नरेंद्र परदेशी व सुनील सोनार यांनी प्रशासनाकडे केली़ दरम्यान, ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच शुक्रवारी काही वेळातच ठेका रद्द करण्याची टिप्पणी तयार होऊन त्यावर उपायुक्त, कार्यकारी अभियंता व अन्य अधिका:यांच्या स्वाक्ष:या झाल्याचे समोर आले आह़े या दोन्ही आरोग्य केंद्राच्या कामाचा ठेका रद्द करण्यासाठी संबंधित फाईल कार्यकारी अभियंता यांच्या शिफारसशीसह तपासणीसाठी मुख्य लेखा परीक्षकांकडे पाठविण्यात आली आह़े अंतिम नोटीस दिल्यानंतर काम सुरू केले नाही म्हणून ठेका रद्द करून फेरनिविदा मागविण्यात यावी, अशा आशयाची ही टिप्पणी आह़े याबाबत ठेकेदाराने काम का सुरू केले नाही ? यासह विविध मुद्यांद्वारे चौकशी केली जाईल, असे लेखा विभागाने स्पष्ट केले आह़े समतानगर व प्रभातनगर भागात प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित असून ही दोन्ही कामे 15 जानेवारीर्पयत सुरू न झाल्यास आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा संबंधित भागाच्या नगरसेविका कशीश उदासी व नलिनी वाडिले यांनी आयुक्तांना दिला आह़े सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे तत्काळ पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आह़े त्यामुळे दोन्ही कामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आह़े नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी कामे मार्गी लागणे गरजेचे आह़े
दोन नगरसेविकांचा उपोषणाचा इशारा!
By admin | Published: January 08, 2017 12:01 AM