लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर, जि. जळगाव : राज्यात जनतेचे शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या आडून अधिवेशन घेण्याचे टाळत आहे. मुळातच महाविकास आघाडी शासनात एकमत नसल्याने अपयश झाकण्यासाठी अधिवेशन कमी कालावधीत आटोपण्याचा घाट रचल्याचा आरोप माजी मंत्री व भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.
दोन दिवसांच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोरोनाकाळात मंत्र्यांच्या कार्यक्रमाला व मोर्चांना होणारी गर्दी शासनाला दिसत नसावी. अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जाऊ नयेत, यासाठी हा आटापिटा सुरू आहे. केवळ सोपस्कार म्हणून दोन दिवसांचे अधिवेशन घेतले जात आहे. अधिवेशन काळात जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरू, असा इशाराही त्यांनी दिला.