जळगाव : पोलीस अधीक्षक बंगल्याच्या आवारात गेलेला नऊ मिटरचा रस्ता ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने कबुल केल्याप्रमाणे कर्मचारी निवास्थानाच्या दुरूस्तीचे काम आता येत्या दोन दिवसात केले जाणार आहे. हा चौक येत्या काही महिन्यात अधिक सुशोभिकरण करणे प्रस्तावित असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. काव्यर}ावली चौकातून आदर्श नगरकडे जाणा:या 18 मिटर रस्त्यापैकी नऊ मिटर रस्त्याची जागा पोलीस अधीक्षक बंगल्याच्या कंपाऊंडवॉलमध्ये आहे. ही जागा परत मिळावी व रस्ता मोकळा व्हावा म्हणून मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही जागा मोकळी करून देण्याबाबत पोलीस प्रशासनास आदेश दिले होते. मात्र अद्यापही ही जागा मोकळी न झाल्याबद्दल ‘लोकमत’ मध्ये गेल्या 5 जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. मनपाकडून पत्राची दखलपोलीस प्रशासनाच्या पत्रानुसार कर्मचा:यांच्या निवासस्थांनीच दुरूस्ती करण्याचे काम आता येत्या दोन दिवसात सुरू केले जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार हे दुरूस्तीचे कामे केले जाणार आहेत. चौकाचे होणार सुशोभिकरणपोलीस अधीक्षक बंगल्याच्या आवारातील कामे झाल्यावर हा रस्ता मोकळा होईल. आकाशवाणी चौकाकडे येताना या चौकात आल्यावर डाव्या आदर्श नगरकडे जाणा:या वळणाच्या रस्त्यावर एक आकर्षक आयलॅँड करण्यात येणार आहे. त्यामुळे आदर्शनगरकडे जाणारी वाहतूक ही चौकापासून वेगळे होऊन चौक ब:याचशा रहदारीपासून मोकळा होईल. यासाठी आíकटेक्टकडून नकाशा तयार करून घेण्यात येत असल्याचे महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले.
निवासाची दोन दिवसात दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2017 12:41 AM