लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : येथील समग्र शिक्षा अभियानात कार्यरत असलेले रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एमआयएस को ऑर्डीनेटर योगेश अहिरवार हे भडगाव येथे अतिरिक्तपदाचे काम करण्यासाठी पाचोर्याहून भडगाव येथे मोटरसायकलवर जात असताना बांबरूड फाट्याजवळ एक मोटरसायकलस्वार रस्त्त्यात आडवा आल्याने अपघात झाला. या अपघातात योगेश अहिरराव यांच्या डोळ्याला तर नरेंद्र शिरसाळे यांच्या हाताला दुखापत झाली.
समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी मानधन तत्वावर काम करणारे रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एमआयएस को ऑर्डीनेटर योगेश अहिरराव यांच्याकडे पाचोरा तालुक्यासह भडगाव तालुक्याचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. त्यात अहिरराव यांच्याकडे चाळीसगावही आहे. मुख्य कार्यालयासह अतिरिक्त तालुक्यांची जबाबदारीसुध्दा तेवढ्याचच जबाबदारीने करावी लागते. त्यात गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्टातील समग्र शिक्षा अभियानाचे कंत्राटी कर्मचारी सोडून फक्त आणि फक्त जळगाव जिल्ह्यातील या कर्मचार्यांना बायोमॅट्रीक प्रणालीत घेण्याची धडपड सुरू आहे.
याबाबत कोणताही लेखी आदेश नसतानाही या कर्मचार्यांचे माहे नोहेंबर २०२०चे मानधन थांबविण्यात आले आहे. एकीकडे कंत्राटी पद अन दुसरीकडे बायोमॅट्रीकची टांगती तलवार डोक्यावर घेउन हे कर्मचारी काम करीत आहेत. अशात शाळाभेटी व अतिरिक्त तालुक्यांसाठी काम करताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे. अशात आज या दोघे तरूणांचा अपघात झाला. या अपघातात ही दोघे तरूण बचावले असून यांच्यावर पाचोरा ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. अमित साळुंखे यांनी प्रथमोपचार केला.
दरम्यान घटना घडताच भडगाव येथील शिक्षक टिकाराम पाटील, डाटा एन्ट्री ऑपरेटर किशोर पुजारी, समावेशित शिक्षण तज्ज्ञ निंबा परदेशी यांनी घटनास्थळाहून दोघा जखमींना पाचोरा येथे आणले. पाचोर्याला डाटा एन्टी आॅपरेटर सुनिल शिवदे व आरोग्य विभागाचे चंद्रकांत पाटील यांनी जखमींना उपचारास नेण्यास मदत केली.