जळगाव,दि.13- राष्ट्रीय आरोग्य पोषण व पाणी योजना,नांद्रा ते ममुराबाद अपूर्ण रस्ता पुर्ण दाखवून अपहार केल्याप्रकरणी ममुराबाद (ता.जळगाव) येथील माजी सरपंच चंद्रकांत भागवत पाटील (वय 47) व भरत प्रताप शिंदे (वय 42) यांना तालुका पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 14 एप्रिलर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सन 2011 ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत तत्कालीन सरपंच व विद्यमान समिती अध्यक्षांनी पाणी योजनेच्या पाईप गॅलरीचे काम झालेले नसताना ते पुर्ण झाल्याचे दाखवून 22 लाख 83 हजार 348 रुपयांचा, नांद्रा ते ममुराबाद हे अंतर जास्त दाखवून 87 लाख 36 हजार 648 रुपयांचा तर पाण्याचे टाकीचेही काम निकृष्ट करुन 22 लाख 74हजार 399 व टाक्यांचे बांधकाम पूर्ण दाखवून 3 लाख 28 हजार 143 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार महेंद्र आत्माराम सोनवणे यांनी न्यायालयात केली होती.