भुसावळ: मुंबईवरून वाराणसी कडे जाणारी वाराणसी एक्सप्रेस तसेच वास्को वरून दिल्लीला जाणारी गोवा एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या चाकांचे स्प्रींग तुटल्याचे भुसावळ येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने या दोन्ही गाड्यांचे अपघात तळले. ऐन सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची मात्र गैरसोय झाली.गाडी क्रमांक १२१६७ मुंबई -वाराणसी ही एक्सप्रेस फलाट क्रमांक येथील ७ वर येत असताना इंजन पासून १६ वा कोच क्रमांक एस-११ या गाडीचे उजव्या बाजूचे बोस्टर स्प्रिंग तुटल्याचे लक्षात आले. कर्तव्यावर असणारे राजन मोहनलाल, सुनील भापीरात हे गाडीचे परीक्षण करत असताना त्यांना हे दिसले. गाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाºयांना कळवून तुटलेल्या स्प्रिंगच्या ठिकाणी नवीन स्प्रिंग टाकून निर्धारित वेळेपेक्षा आधीच उशीरा आलेली गाडी स्प्रिंग दुरुस्तीनंतर सकाळी ९:५८ आलेली गाडी १ तास १० मिनिटाच्या उशिराने वाराणसी कडे रवाना झाली.गोवा एक्सप्रेस चे ही स्प्रिंग तुटलेगाडी क्रमांक१२७७९ डाऊन वास्को-द-गामा- हजरत निजामुद्दीन ही गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ६ वर येत असताना कोच क्रमांक एस-१ या गाडीचा तांत्रिक विभागाचे कर्मचारी हेमंत नारायण हे रोलींग ईन परीक्षण करत असताना स्प्रिंग तुटल्याचे लक्षात आले. गाडी दुपारी १:५६ मिनिटाने आल्यानंतर दुसरुस्ती करुन सुमारे १ तास २५ मिनिटाने उशिराने सोडण्यात आली.दरम्यान अलीकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे स्प्रिंग तुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असतानाचे दिसून येत आहे दिवाळी सणाच्या वेळेस भुसावळ रेल्वे स्थानकावर गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली व त्यांचे पुढील नियोजन कोलमडलेदोन्ही घटनांमध्ये यांत्रिकी विभागाचे वरिष्ठ अधिकारी शेख जावेद ,शेख असलम, विजय वाघ, पुंडलिक धाना, हेमंत कुमार ,संदीप वंजारी, वीरेंद्र कुमार, एकनाथ हरी , देवेंद्र ,विजय सिंग या तांत्रिक भागाच्या अधिकारी व कर्मचाºाांनी युद्धपातळीवर कार्य केले.पहिल्या छायाचित्रात गोवा एक्सप्रेस चा तुटलेला स्प्रिंग दुस?्या छायाचित्रात वाराणसी एक्सप्रेसच्या स्प्रिंगला गेलेला तडा
एकाच दिवशी दोन एक्सप्रेसचे अपघात टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 5:48 PM