जळगाव - मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर गुरुवारी सर्व अर्जांची प्रभागनिहाय छाननी करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे प्रभाग १९ ‘ब’ व ‘क’ मधील दोन उमेदवारांच्या एबी फॉर्म मध्ये चुका झाल्याने त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर लढता येणार नसल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.बुधवारपर्यंत दाखल ६१५ उमेदवारी अर्जांवर शुक्रवारी छाननी करण्यात आली. सकाळी ११ वाजेपासून प्रभागनिहाय छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली. यामुळे मनपाच्या दुसºया व पाचव्या मजल्यावर उमेदवारांसह समर्थकांची गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून माईकव्दारे पुकारा केल्यानंतर संबधित प्रभागातील उमेदवाराला बोलावून घेत त्यांच्या अर्जामधील चुका तपासून घेण्यात आल्या.सर्वसाधारण महिलेचा अर्ज पुरुष उमेदवारालाशिवसेनेच्या प्रभाग १९ क मधील उमेदवार जिजाबाई भापसे व ब मधील उमेदवार गणेश सोनवणे यांच्या एबी फॉर्म देताना पक्षाकडून चुक झाली. गणेश सोनवणे यांना सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या प्रभाग क मधील एबी फॉर्म देण्यात आला. तर जिजाबाई भापसे यांना नामाप्र राखीव असलेल्या प्रभाग ब मधील एबी फॉर्म दिला गेला. याबाबत भाजपचे उमेदवार ललित कोळी यांनी हरकत घेतली. तसेच ही चुक निवडणूक विभागाच्या अधिकाºयांचाही लक्षात आली होती.
एबी फॉर्म मधील त्रुटी शिवसेनेच्या दोन उमेदवारांना भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 9:10 PM
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर गुरुवारी सर्व अर्जांची प्रभागनिहाय छाननी करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे प्रभाग १९ ‘ब’ व ‘क’ मधील दोन उमेदवारांच्या एबी फॉर्म मध्ये चुका झाल्याने त्यांना शिवसेनेच्या चिन्हावर लढता येणार नसल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.
ठळक मुद्देमाजी महानगरप्रमुख यांच्या एबी फॉर्ममध्ये त्रुटीअपक्ष म्हणून लढवावी लागेल निवडणूकशपथपत्र, घोषणापत्रांवर स्वाक्षरी नसलेल्या उमेदवारांचा अर्ज ही ठरले बाद